H3N2 Virus: गर्भवती महिलांमध्ये 'ही' लक्षणे दिसल्यास, वेळीच सावध व्हा

देशात सध्या H3N2 विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे,.
H3N2 Virus
H3N2 VirusDainik Gomantak

H3N2 Virus Symptoms: देशात कोरोनानंतर H3N2 व्हायरने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. बदलत्या हवामानामध्ये पसरणाऱ्या या विषाणूमुळे सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

देशासह महाराष्ट्रामध्येही या विषाणूने डोके वर काढले आहे. मुंबई आणि पुण्यासह इतर शहरांमध्येही H3N2 विषाणूचा संसर्ग वाढत आहे. देशात या संसर्गामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नीती आयोगाने या विषाणुपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यास सांगितले आहे.

काय आहे H3N2

H3N2 विषाणू H1N1 फ्लूचा उपप्रकार आहे. बदलत्या हवामानामुळे या विषाणूचे म्युटेशन झाले आहे. या विषाणूची लक्षणे कोरोना विषाणू सारखी आहेत. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी याची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना यांना या विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. लहान मुलं, वृद्ध आणि गर्भवती महिलांमध्ये या विषाणूची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतात. ही लक्षणे कोणती ते जाणून घेउया.

H3N2 Virus
H3N2 Symptoms In Kids: H3N2 विषाणूने घातले थैमान, लहान मुलांमध्ये 'ही' लक्षणे दिसल्यास करु नका दुर्लक्ष

गर्भवती महिलांमधील लक्षणं

H3N2 विषाणू संसर्ग झाल्यास गर्भवती महिलांमध्ये काहीशी वेगळी लक्षणे दिसतात.गर्भवती महिलांना तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असल्यास काळजी घ्यावी आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 1. ब्राँकायटिस

 2. खोकला आणि सर्दी

 3. जास्त कफ

 4. अंगदुखी

 5. डोकेदुखी

ही लक्षणे गर्भवती महिलांमध्ये दिसून येतात

लहान मुलांमधील लक्षणं

 1. तीव्र ताप

 2. पोटदुखी

 3. मळमळ

 4. उलट्या

 5. खोकला

 6. सर्दी

 7. कफ न निघणे

 8. न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागतात.

प्रौढांमधील लक्षणं

 1. छाती गच्च वाटणे

 2. तीन दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला

 3. जुलाब

 4. मळमळ

 5. डोकेदुखी

 6. अशक्तपणा

ही प्रौढांमध्ये दिसणारी लक्षणे आहेत. प्रौढांना विशेषत: वृद्ध व्यक्तींना फुफ्फुसात संसर्ग वाढल्यास श्वास घेण्यास गंभीर त्रास होऊ शकतो.

H3N2 Virus
Ayurvedic Remedies For Stress Relief: धोकादायक आजारांचे कारण असु शकते स्ट्रेस, 'या' आयुर्वेदिक उपायांनी करा दुर
 • H3N2 व्हायरस या लोकांसाठी अधिक धोकादायक

1. 5 वर्षांखालील लहान मुले
2. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची वृद्ध
3. गर्भवती महिला
4. श्वसन आणि दमा रुग्ण
5. मधुमेह रुग्ण
6. कर्करोग रुग्ण

H3N2 व्हायरस पासून असा करावा बचाव

 1. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे

 2. खोकताना आणि शिंकताना नाकाला रुमाल लावावा

 3. प्रदूषित ठिकाणी जाणे टाळावे

 4. बाहेर तळलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे

 5. हात नेहमी धुत रहावे

 6. जास्त पाणी प्यावे

 7. ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्यावी.

 8. ताप 2-3 दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com