Ayurvedic Remedies For Stress Relief: आजच्या वेगवान जगात तणाव ही एक सामान्य समस्या आहे. बरेच लोक तणाव कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. आयुर्वेद ही एक प्राचीन भारतीय औषध प्रणाली आहे. जी संपूर्ण आरोग्य आणि निरोगीपणाला चालना देण्यासाठी नैसर्गिक उपायांचा वापर करते.
काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती, तेल आणि पद्धती तणाव कमी करण्यास आणि ध्यान, प्राणायाम आणि योगासने आराम करण्यास मदत करतात. ते शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करण्याचे काम करतात.
त्यामुळे तणावाचा सामना करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय वापरणे खूप फायदेशीर आहे. चला काही आयुर्वेदिक उपायांबद्दल जाणून घेऊया.
अश्वगंधा
या औषधीमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. अश्वगंधाच्या मुळाचे चूर्ण बनवून गरम पाण्यासोबत सेवन करता येते.
ब्राह्मी
ब्राह्मी मन शांत करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते. ब्राह्मी चहा बनवून त्याचे सेवन करु शकता.
जटामांसी
जटामांसी शांती आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याची पावडर बनवून गरम पाण्यासोबत सेवन करता येते.
योग आणि प्राणायाम
योग आणि प्राणायाम तणाव कमी करण्यास मदत करतात. योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. प्राणायामामुळे मानसिक शांती मिळून तणाव कमी होतो.
मोहरीचे तेल
मोहरीचे तेल शरीरावरील ताण कमी करण्यास मदत करते. नाभीवर लावून मसाज करवी.
तुळशी
तुळशीमुळे तणाव कमी होऊन मानसिक शांती मिळते. तुळशीचा चहा बनवून पिऊ शकता.
पाढंरी मुसळी
सफेद मुसळी ताण कमी करण्यास आणि ऊर्जा वाढविण्यास मदत करते. हे पावडर स्वरूपात घेतले जाऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.