H3N2 Symptoms In Kids: देशात कोरोनानंतर एच3एन2 हा विषाणू थैमान घालत आहे. या विषाणूमुळे देसातील दोन नागरिकांचा मृत्यु झाला आहे. या विषाणूचा धोका लहान मुलांना देखील आहे. प्रत्येक 10 पैकी 6 मुले फ्लूसारख्या लक्षणांमुळे डॉक्टरांकडे जात आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून भारतात किंवा एच३एन२ विषाणूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात, आरोग्य मंत्रालयाने सांगितले की H3N2 विषाणूमुळे व्हायरल तापाची संख्या वाढली आहे, परंतु पुढील महिन्यापासून प्रकरणे कमी होऊ लागतील. लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा विषाणू पाच ते सात दिवस शरिरात राहतो. तापही तीन दिवसांत बरा होतो, पण खोकला जास्त काळ टिकतो. अगदी सौम्य प्रकरणांमध्ये, खोकला अनेक दिवस त्रासदायक असू शकतो.
ताप येणे हा सहसा गंभीर आजार मानला जात नाही, परंतु अलीकडे पाच वर्षांखालील मुलांनाही श्वसनाच्या समस्यांमुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे पालकांनी या विषाणूची लक्षणे वेळीच ओळखणे आवश्यक आहे.
H3N2 इन्फ्लूएंझाची लक्षणे कोणती?
- श्वासोच्छवासाचा त्रास
- सतत ताप येणे
- छाती किंवा पोटदुखी
- स्नायू दुखणे
- अशक्तपणा आणि चक्कर येणे
- जुन्या आजाराची पुनरावृत्ती
- सर्दी आणि खोकला
याशिवाय काही मुलांमध्ये जुलाब, उलट्या यासारख्या जठरासंबंधी समस्याही डॉक्टरांनी पाहिल्या आहेत. ताप काही दिवसात कमी होतो, पण खोकला वाढतच जातो. हा संसर्ग 8 ते 10 दिवस त्रास देऊ शकतो.
H3N2 व्हायरस या लोकांसाठी अधिक धोकादायक
- 5 वर्षांखालील लहान मुले
- 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची वृद्ध
- गर्भवती महिला
- श्वसन आणि दमा रुग्ण
- मधुमेह रुग्ण
- कर्करोग रुग्ण
आरोग्य तज्ञ 5 वर्षांखालील मुलांना या विषाणूपासून बचाव करण्यासाठी फ्लूचा शॉट देण्याचा सल्ला देत आहेत.
सतर्क राहण्याची गरज कधी आहे?
गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या बालकांची संख्या वाढली आहे. या मुलांना ऑक्सिजनची गरज होती. त्यामुळे संसर्ग होऊन तीन दिवस उलटूनही खोकला वाढत असेल आणि ताप उतरण्याचे नाव घेत नसेल, तर तर वेळीच काळजी घ्यावी याशिवाय H3N2 संसर्गामुळे जीवघेणा न्यूमोनिया देखील होऊ शकतो, ज्यासाठी व्हेंटिलेटर सपोर्ट आणि आयसीयूची देखील आवश्यकता असू शकते.
H3N2 व्हायरस पासून असा करावा बचाव
सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे
खोकताना आणि शिंकताना नाकाला रुमाल लावावा
प्रदूषित ठिकाणी जाणे टाळावे
बाहेर तळलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे
हात नेहमी धुत रहावे
जास्त पाणी प्यावे
ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्यावी.
ताप 2-3 दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.