सम्राट क्लबच्या 'या' महान कार्यात विद्यार्थ्यांना मिळते स्फूर्ती

'हे' काम माझं नाही याचमुळे आपण पाठीमागे राहतो; प्रशांत जोशी
Goa Students  सम्राट क्लबच्या 'या' महान कार्यात विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते - प्रशांत जोशी
Goa Students सम्राट क्लबच्या 'या' महान कार्यात विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते - प्रशांत जोशीDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी : विद्यार्थ्यांच्या (Goa Students) कलागुणांना वाव देण्याचे महान कार्य सम्राट क्लब करीत असून पूर्वीच्या काळी विद्यार्थी (Students Inspired) दशेत असल्या संधी मिळत नव्हत्या जे सम्राट क्लब (Samrat Club) विद्यार्थ्यांसाठी करत आहे. सम्राट क्लबच्या या महान कार्यात विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते व चालना मिळते. तेव्हा त्याचा गोड निकाल विद्यार्थ्यांकडून मिळतो असे प्रतिपादन उद्योजक प्रशांत जोशी (Prashant Joshi) यांनी केले.

Goa Students  सम्राट क्लबच्या 'या' महान कार्यात विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते - प्रशांत जोशी
नवीन किंमती लागू झाल्यानंतर, हे आहेत 200 रुपयांपेक्षा कमीचे रिचार्ज प्लॅन

सम्राट क्लब वास्कोतर्फे रवींद्र भवन बायणा येथे आयोजित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात जोशी प्रमुख पाहुणे या नात्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सम्राट साखळीचे माजी अध्यक्ष अमोल बेतकीकर, सम्राट स्टुडंट्स फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सम्राट क्लब वास्कोचे जयराम पेडणेकर, सचिव गिरीष कोळमकर खजिनदार सुर्यकांत गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना जोशी म्हणाले की कोणतेही काम करण्यासाठी आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. हे काम माझं नाही असे म्हटल्यास आपण पाठीमागे राहतो. तसेच सगळ्यांना आदर द्यायला हवा. आता लोक नोकरीच्या मागे धावतात. पण आजचा खरा मंत्र आहे स्वतः नोकरी तयार करा असे सांगताना सम्राट आपणास मानाचे व्यासपीठ देऊन गौरव केल्याबद्दल विद्यार्थ्यांने सम्राट क्लबचे आभार मानावे असे ते विद्यार्थ्यांना संबोधून शेवटी म्हणाले.

Goa Students  सम्राट क्लबच्या 'या' महान कार्यात विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते - प्रशांत जोशी
महिला पोलीस कॉन्स्टेबलला 'ट्रांन्सजेंडरींग' साठी सरकारची परवानगी

कार्यक्रमाची सुरुवात सम्राट अशोक मांद्रेकर यांनी गायलेला गणेश वंदनाने करण्यात आली. नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष जयराम पेडणेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सम्राट स्टुडंट्स फाउंडेशनचे प्रतिनिधी अमोल बेतकीकर यांनी सम्राट स्टुडंट्स फाउंडेशनची माहिती स्पष्ट केली. दरम्यान यावेळी मुरगाव तालुक्यातील ३९ शाळांमधील प्रत्येकी एक हुशार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.

Goa Students  सम्राट क्लबच्या 'या' महान कार्यात विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते - प्रशांत जोशी
आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी दोन डोस घेतले तरी कोरोना RT-PCR चाचणी बंधनकारक

यात सैल जगदीश (विद्या विहार हायस्कूल थाना कुठ्ठाळी), चारीने अलिशा डिसोझा (रेजीनामुंडी हायस्कूल, चिखली), मुझाम्मिल्ल अब्दुल अलगद गिरी (अंजुमन हीमायतुल इस्लाम हायस्कूल बायणा, (वास्को), कायरा परेरा ( सेंट जोसफ इन्स्टिट्यूट, वास्को), सानिया परब (मुरगाव हायस्कूल हेडलँड, सडा), दीक्षा सलाम (माता सेकंडरी स्कूल नं.१ वास्को), सुमन चवान (शांतादुर्गा हायस्कूल सांकवाळ), रेवथी प्रसाद (दिप विहार हायस्कूल (हेडलँड सडा), श्वेता केवट (मुन्सिपल हायस्कूल वास्को), सी. दिव्यश्री (विद्या मंदिर आदर्श नगर चिखली), आतोनिओ कारव्हालो ( अवर लेडी ऑफ लॉर्डस हायस्कूल उर्तोर्डा माजोर्डा सालसेत), अंजना रूडगी (युवक संघ हायस्कूल हेड लँड सडा वास्को), जैस्वर सुरेशचंद (अवर लेडी ऑफ कांदेलेरिया बायणा), अफिया गब्बुर (सरकारी हायस्कूल वास्को मेंन), साही फडके (केशव स्मृती हायस्कूल वास्को आल्त दाबोळी), शुभम मांद्रेकर (सरकारी हायस्कूल वाडे नगर वास्को), विक्रम गिरी (सरकारी हायस्कूल मांगुर हिल वास्को), ज्योती निषाद (सरकारी हायस्कूल नवेवाडे वास्को), नाकुश जाधव (कालिदास असोसिएशन एस व्हाय एस एम हायस्कूल झुआरी नगर), प्रज्वल पुजारी (सरकारी हायस्कूल झुआरी नगर), शफक खाझी (मदर ऑफ मर्सिस हायस्कूल मर्सिसवाडे वास्को), साहस पाल (अवर लेडी ऑफ देस्तेरो वास्को गोवा), समीर गावडे ( वाडेनगर इंग्लिश हायस्कूल वाडे वास्को), संगीता पाल श्री सुसेनाश्रम विद्यालय जेटी मुरगाव), सकिना रमजान अली (अमिनिया हायस्कूल बायणा), सेलमा कुतिन्हो (अवर लेडी ऑफ परपेच्यूयल हायस्कूल कुठ्ठाळी), नेहमीह सेब्रिन्हो सेंट थॉमस हायस्कूल (कासावली), असमिया कारव्हालो सेंट जोसेफ वाझ हायस्कुल सांकवाळ), तनु प्रजापती इन्फंट जेजुस अकादमी वेलसाव), फातिमा नदाफ ( लेफ्ट. नरेंद्र मयेकर सरकारी हायस्कूल ), आणि धनश्री मदार (श्री यल्लालिंगेश्वर शारदा मंदिर (सासमोंळे बायणा) यांना गौरविण्यात आले. शेवटी सम्राट क्लब वास्कोचे सचिव गिरीष कोळमकर यांनी आभार प्रदर्शन केले.तर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती जोशी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com