आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी दोन डोस घेतले तरी कोरोना RT-PCR चाचणी बंधनकारक

भारत सरकारकडूनही नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
RT-PCR
RT-PCRDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोनाचा (Corona) ओमिक्रॉन (Omicron) नवा विषाणू पसरत असून सर्वांची धाकधूक वाढली आहे. ओमिक्रॉनमुळे संपूर्ण देश दहशतीखाली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण भागात सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक देशांनी सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे. अनेक देशांनी ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

भारत सरकारकडूनही (Government of India) नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. आणि या गाईडलाईन्सची अमलबजावणी आजपासूनच होणार आहे. सुधारित गाईडलाईन्सनुसार, याचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींसुद्धा विमानतळावरच कोरोनाची टेस्ट केली जाणार आहे.

RT-PCR
Omicron Variant: भारतीय रेल्वेही अ‍ॅक्शन मोडवर

तसेच, दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) भारतीय नागरिक अडकले आहेत परंतु ज्यांना या व्हेरियंटची लागण झाली आहे त्यांना तेथील स्थानिक वाणिज्य दूतावासांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. हवाई सुविधा पोर्टलवर कोरोना निगेटिव्ह RT-PCR अहवाल तसेच कोविड-19 चाचणीचा अहवालाची माहिती देणे बंधनकारक आहे.

कोरोनाच्या नव्या संसर्गाचा धोका असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या नागरिकांनी भारतात (India) येत असताना 72 तास आधी कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक असेल. तसेच भारतात विमानतळावर आलेनंतर पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. जर या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाइन (Quarantine) केले जाईल. तसेच त्यांच्यावर प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार केले जातील. शिवाय, त्या नागरिकांचे कोरोनाचे सर्व नमुने संपूर्ण पुढील चाचणीसाठी पाठवले जातील. विमानतळावर कोरोना चाचणी निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांना घरी जाण्यास परवानगी असेल. तसेच भारतात आल्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येईल. आणि पुढील 7 दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावे लागेल.

RT-PCR
Corona Vaccine: 'स्वखर्चाने लस घेतलीय, पंतप्रधांनाचा फोटो'

विमान प्रवासाचे (Air travel) तिकिट बुक करत असताना विमान कंपन्याना कोरोना चाचणीबद्दल हमी द्यावी लागणार आहे. तसेच, मागील 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान कंपन्यांनी ई-मेलद्वारे घेतील. अशी प्रशासनाकडून सूचना देण्यात आली आहे. मागील 15 दिवसांमध्ये आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केला असेल तर त्या नागरिकांना तातडीने सात दिवसांसाठी विलगीकरण केले जाईल. विलगीकरणासाठी 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार हॉटेल्सची व्यवस्था असेल. विलगीकरणाच्या कालावधीनंतरही 14 दिवसांच्या होम क्वारंटाईन व्हावे लागेल. मुंबई महापालिकेचे रिचर्डसन अँन्ड क्रुडास कोविड सेंटर हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com