महिला पोलीस कॉन्स्टेबलला 'ट्रांन्सजेंडरींग' साठी सरकारची परवानगी

मध्य प्रदेशात प्रथमच गृह विभागाने पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला लिंग बदलण्याची परवानगी दिली आहे.
adhya Pradesh government gives permission to female police constable for gender change
adhya Pradesh government gives permission to female police constable for gender change Dainik Gomantak

भोपाळ: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) प्रथमच गृह विभागाने पोलीस (police) हवालदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला लिंग बदलण्याची(transgendering) परवानगी दिली आहे. ज्याला परवानगी देण्यात आली ती व्यक्ती महिला कॉन्स्टेबल आहे. तीने पुरुष होण्यासाठी लिंग बदल करण्याची परवानगी विभागाकडे मागितली होती. राष्ट्रीय स्तरावरील मनोचिकित्सकांनी या घटनेची पुष्टी केली आहे की, महिला कॉन्स्टेबलला लहानपणापासून जेंडर आइडेंटिटी संबंधी डिसऑर्डर आहे.

adhya Pradesh government gives permission to female police constable for gender change
आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी दोन डोस घेतले तरी कोरोना RT-PCR चाचणी बंधनकारक

मिळालेल्या माहितीनुसार, अनिता (नाव बदलले आहे) या महिला कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. तीला पोलिस महासंचालकांनी लिंग बदल करण्याची परवानगी दिली आहे. अमिताने आपल्या जिल्ह्यात पुरुषांप्रमाणे पोलिसांचे काम केले आहे. त्याच बरोबर रीतसर परीक्षाही दिल्या आहेत. आणि आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. लिंग बदलण्याच्या इराद्याची अधिसूचना 2019 मध्ये भारताच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतरच हा अर्ज पोलिस मुख्यालयात पाठवण्यात आला. या अर्जावर पोलीस मुख्यालयाने गृह विभागाकडे परवानगी मागितली होती. भारतीय नागरिकाला त्याचा धर्म, जात किंवा त्याचे लिंग निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. यामुळे अनिताला लिंग बदल करण्यास परवानगी देण्यात कोणतीही अडचण नाही, असे कायदा विभागाने गृह विभागाला दिलेल्या सल्ल्यात म्हटले आहे.

adhya Pradesh government gives permission to female police constable for gender change
Ayush Ministry Recruitment: 10वी पास उमेदवारांना आयुष मंत्रालयात नोकरीची संधी

बीड येथील 29 वर्षीय महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे यांनी लिंग बदलण्याची परवानगी मागितल्याची पहिली घटना पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडली होती. देशातील ही पहिलीच केस होती. सर्व कायदेशीर अडथळे दूर करून ललिता साळवे या ललित साळवे झाल्या. या कायदेशीर प्रक्रिसाठी त्यांना दोन-तीन वर्षे लागली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com