Ganesh Chaturthi Festival: गणेश पूजनासाठी 'अशी' करा पूजेची तयारी

गणपती पूजनासाठी लागणाऱ्या पूजासाहित्याविषयी थोडीफार माहिती आम्ही तुम्हाला देतोय.
Ganesh Chaturthi Festival
Ganesh Chaturthi FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi Festival भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला साजरा होणारा गणेशोत्सव यंदा म्हणजेच 2023 सालात 19 सप्टेंबरला साजरा होतोय. बुद्धीदाता, कार्यारंभी पूजनीय असणाऱ्या या गणपती गजाननाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय.

देशाच्या बहुतांश भागात गणेशोत्सव साजरा केला जातो परंतु गोवा आणि लगतच्या कोकणात या उत्सवाचं आगळंवेगळं रूप पहायला मिळतं. सध्या घरोघरी या विघ्नहर्त्याच्या आगमनाची तयारी सुरू झालीय.

साफसफाई, रंगरंगोटी, सजावट ही तयारी तर आपण सर्वजण प्रत्येक समारंभाआधी करतोच. परंतु श्रींची पूजा कुलाचाराप्रमाणे प्रतिवार्षिक असल्याने गणपती पूजनासाठी लागणाऱ्या पूजासाहित्याविषयी थोडीफार माहिती आम्ही तुम्हाला देतोय. दरवर्षी तुम्हाला लागणाऱ्या पूजासाहित्याची सविस्तर माहिती या बातमीमार्फत तुम्हाला मिळणार आहे.

Ganesh Chaturthi Festival
कोची येथून 2021 साली बेपत्ता झालेल्या तरुणाचा गोव्यात खून, दोन वर्षांनंतर आरोपींची कबुली

पार्थिव गणेशाचे पूजन करताना सुचिर्भूत होऊन आसनस्थ व्हावे. यासाठी जमिनीवर बसण्यासाठी आसन किंवा पाट घ्यावा. पूजेसाठी शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा कलश घ्यावा. (कलश तांब्याचाङ किंवा पितळ, चांदी आदि धातूंचा असावा, प्लास्टिकचा नकोच) काही ठिकाणी झारी वापरण्याचा देखील प्रघात आहे.

आचमन करण्यासाठी ताम्हाण, पंचपात्री, गंध उगाळण्यासाठी सहाण, चंदनाचे खोड, गंध ठेवण्यासाठी थाटी किंवा वाटी, आचमन करून झाल्यावर हात पुसण्यासाठी हातरूमाल जवळ ठेवावा.

पूजासाहित्य ठेवण्यासाठी तबक, त्या तबकामध्ये अक्षता म्हणजेच ओले आणि खंडीत न झालेले पिंजर मिश्रित तांदूळ, तसेच हळद- पिंजर-अबीर-बुक्का-शेंदूर अत्तर, गंध, सुवासिक तेल, गंधोदक, कापसाचे वस्त्र (हे आपण 11, 21 किंवा 51 मण्यांचे वापरू शकतो) जानवी म्हणजेच यज्ञोपविताचे जोड, विड्याची पाने, सोललेल्या सुपाऱ्या, सुट्टे पैसे (नाणी) पंचामृत (पंचामृत म्हणजे दूध, दही, मध, तूप, साखर यांचे मिश्रण)

पंचफळे- यासाठी नारळ, डाळिंब, केळी, पेरू, चिकू अशी फळे वापरता येतील) धूप, कापूर, निरांजन, पंचारती त्यात प्रज्वलित करण्यासाठी तुपाने भिजवलेल्या फुलवाती, समई किंवा नंदादीप त्यात प्रज्वलित करण्यासाठी तेल आणि बोटवाती, नैवेद्यासाठी गूळ खोबरं, मोदक, किंवा फळे, पूजेसाठी लागणारी जास्वंद, गुलाब, सोनचाफा, जाई आदीं फुलं अशी सर्व सामग्री तयार करून ठेवावी. या व्यतिरिक्त जर काही अन्य सामग्रीची आवश्यकता भासली असेल तर ते साहित्य तुमच्याकडे पूजा सांगायला येणारे गुरूजी तुम्हाला नक्कीच सांगतील

Ganesh Chaturthi Festival
Mandrem Police Station: मांद्रे पोलिस स्टेशनला हिरवा कंदील : आमदार जीत आरोलकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com