Mandrem Police Station: मांद्रे पोलिस स्टेशनला हिरवा कंदील : आमदार जीत आरोलकर

चतुर्थीपूर्वी वीज उपकेंद्राचे उद्‍घाटन; चोपडे पुलावरील पथदीपही पेटणार
Mandrem Police Station: मांद्रे पोलिस स्टेशनला हिरवा कंदील : आमदार जीत आरोलकर
Dainik Gomantak
Published on
Updated on

Mandrem Police Station: मांद्रे मतदारसंघात गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेंतर्गत निधी खर्चून जे प्रकल्प उभारले आहेत,त्यात चोपडे पूल ते चोपडे जंक्शन, चोपडे जंक्शन ते खिंड मोरजी, हरमल पालये पठार या भागातील प्रकल्पात पथदीपांची सोय केली आहे.

Mandrem Police Station: मांद्रे पोलिस स्टेशनला हिरवा कंदील : आमदार जीत आरोलकर
Girish Chodankar: बहुजन समाजाला गर्भगृहात प्रवेश नाकारणे निषेधार्ह : गिरीश चोडणकर

परंतु हे दिवे पेटत नाहीत, ते दिवे चतुर्थीपूर्वी पूर्ण पेटतील, शिवाय जुनस वाडा मांद्रे येथे उभारलेले स्वतंत्र उपवीज केंद्र चतुर्थीपूर्वी सुरू होईल. लवकरच मांद्रेत पोलिस स्टेशन कार्यरत होईल,अशी माहिती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिली.

‘जीटीडीसी’ने उभारलेल्या प्रकल्पातील पथदीप पेटत नसल्याच्या अनेक तक्रारी वारंवार नागरिक सरपंच आदींनी आमदार जीत आरोलकर यांच्याकडे केल्या होत्या.

त्याची गंभीर दखल घेत आमदार आरोलकर यांनी 14 रोजी जीटीडीसीचे अधिकारी, वीज खात्याचे अधिकारी, स्थानिक सरपंच, पंच सदस्य, नागरिक यांच्या उपस्थितीत या सर्वांची चोपडे सर्कल येथे बैठक घेऊन पथदीप लवकरात लवकर पेटवण्याच्या सूचना केल्या.यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी वीज खात्याचे अधिकारी स्थानिक सरपंच ॲंथोनी फर्नांडिस, पंच सदस्य भगीरथ गावकर आणि इतर पंच उपस्थित होते.

लवकरच स्वतंत्र पोलिस स्टेशन

मांद्रे मतदारसंघ हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे. दरवर्षी पर्यटन हंगामात पावसाळ्यातही हजारो पर्यटक या किनारी भागात येत असतात. त्यानिमित्ताने लहान-मोठ्या घटनाही घडतात. त्यासाठी या मतदारसंघात स्वतंत्र पोलिस स्टेशनची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आपण चर्चा केली असून त्यांनी पोलिस स्टेशनला हिरवा कंदील दाखवला आहे. सध्या आपत्कालीन सेवा देणारी इमारत जुनस वाडा मांद्रे येथे विनावापर पडून आहे. त्या इमारतीचा काही भाग तात्पुरते पोलिस स्टेशन सुरू करण्यासाठी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत,असे सांगून चतुर्थीनंतर मांद्रेत पोलिस स्टेशन होईल, असे आमदार आरोलकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com