Acidity: पोटातली जळजळ धोकादायक! अ‍ॅसिडिटीमुळे होऊ शकतात 'हे' 5 गंभीर आजार, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Frequent Acidity: अ‍ॅसिडिटीची समस्या आता एक सामान्य गोष्ट झाली आहे, पण ती वारंवार होत असेल तर ती गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
Acidity Symptoms
AcidityDainik Gomantak
Published on
Updated on

Frequent Acidity: अ‍ॅसिडिटीची समस्या आता एक सामान्य गोष्ट झाली आहे, पण ती वारंवार होत असेल तर ती गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. बदलती जीवनशैली आणि मसालेदार खाण्यामुळे होणारी छातीतली जळजळ अनेकदा आपल्याला अस्वस्थ करते. चला तर मग अ‍ॅसिडिटी म्हणजे काय, ती का होते, कोणते आजार होऊ शकतात आणि त्यावर काय उपाय आहेत हे जाणून घेऊया...

अ‍ॅसिडिटी

अ‍ॅसिडिटी म्हणजे पचनसंस्थेच्या नैसर्गिक समतोलात बिघाड होणे. यामुळे छातीत जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे आणि पोटात अस्वस्थता जाणवते. अनेकदा आपण जीवनशैलीत बदल करुन ही समस्या दूर करु शकतो, पण वारंवार अ‍ॅसिडिटी होत असेल तर ती काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.

Acidity Symptoms
Mental Health And Heart Disease: नैराश्य आणि ताणतणाव वाढवतात हृदयविकाराचा धोका; मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं

गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज (GERD): जर तुम्हाला सतत छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा घशापर्यंत आंबटपणा जाणवत असेल, तर हे जीईआरडी (GERD) चे लक्षण असू शकते. या स्थितीत पोटात अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. यामुळे अपचन, उलट्या, पोटात दुखणे, त्वचेवर जळजळ आणि मळमळ यांसारखी लक्षणे दिसतात.

पोटातील अल्सर: सततची अ‍ॅसिडिटी हे पोटातील अल्सर (व्रण) चे देखील लक्षण असू शकते. अल्सर म्हणजे पोटाच्या आतल्या आवरणावर होणाऱ्या जखमा. जास्त अ‍ॅसिडिक औषधे किंवा एच. पायलोरी (H. Pylori) नावाच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे हे अल्सर होऊ शकतात.

गॅस्ट्रायटिस (Gastritis): जेव्हा पोटात सूज येते, तेव्हा त्या स्थितीला गॅस्ट्रायटिस म्हणतात. यात सतत अ‍ॅसिडिटी, भूक कमी होणे, उलट्या होणे अशी लक्षणे दिसतात.

पित्ताशयातील खडे (Gallbladder Stones): पित्ताशयात खडे (Gallbladder Stones) असल्यामुळे देखील अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. खासकरुन जास्त तेलकट किंवा जड जेवण खाल्ल्यानंतर छातीत जळजळ आणि अपचन जाणवते.

पॅन्क्रियाटायटिस (Pancreatitis): पोटाच्या मागच्या बाजूला असलेल्या स्वादुपिंडाला (Pancreas) सूज आल्यास पॅन्क्रियाटायटिस होतो. यामुळे सतत अ‍ॅसिडिटी, उलट्या आणि पोटात दुखते. अशा गंभीर स्थितीत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.

Acidity Symptoms
Heart Disease Goa: चिंताजनक! गोव्यात दररोज सापडताहेत हृदयरोगाचे 19 रुग्‍ण; सर्वाधिक संख्या 'या' भागामध्ये

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर तुम्हाला 3-4 आठवड्यांपेक्षा जास्त काळ अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय, अ‍ॅसिडिटीच्या औषधांनीही आराम मिळत नसेल, खाताना पोटात दुखत असेल किंवा जेवणानंतर लगेचच पोट जड वाटत असेल, उलट्या होत असतील, उलट्यांमध्ये रक्त येत असेल किंवा वजन अचानक कमी होत असेल, तर ही गंभीर लक्षणे असू शकतात. अशावेळी लगेच डॉक्टरांकडून उपचार सुरु करावेत.

Acidity Symptoms
Heart Attack: पुरुषांपेक्षा वेगळी का असतात महिलांची हृदयविकाराची लक्षणं? जाणून घ्या डॉक्टरांचं मत अन् प्रतिबंधात्मक उपाय

अ‍ॅसिडिटीपासून बचाव करण्यासाठी उपाय

जीवनशैलीत काही साधे बदल करुन तुम्ही अ‍ॅसिडिटीपासून दूर राहू शकता.

  • आरोग्यदायी जीवनशैली: नियमित आणि वेळेवर खाणे तसेच वेळेवर झोपणे महत्त्वाचे आहे.

  • व्यायाम आणि हायड्रेशन: नियमित व्यायाम करा आणि भरपूर पाणी प्या.

  • योग्य आहार: केळी, पपई, टरबूज, कलिंगड, पेरु, दही आणि दलिया यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

  • काय खाऊ नये: मसालेदार पदार्थ, तेलकट आणि तळलेले पदार्थ, जास्त आंबट पदार्थ, चहा-कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि कांदा-लसूण खाणे टाळा.

हे छोटे बदल तुम्हाला अ‍ॅसिडिटीपासून वाचवू शकतात आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com