Easy Tips To Control Stress: टेन्शन काय को लेने का? ताण, तणाव चिंतेवर विजय मिळवण्याच्या 4 सोप्या टेक्निक्स

Four Easy Technique To Control Stress: ताण, तणाव चिंतेमुळे हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणा अशा आजारांचा धोका वाढू शकतो.
Easy Tips To Control Stress: टेन्शन काय को लेने का? ताण, तणाव चिंतेवर विजय मिळवण्याच्या 4 सोप्या टेकनिक
Four Easy Technique To Control Stress, Anxiety Dainik Gomantak
Published on
Updated on

Four Easy Technique To Control Stress, Anxiety

आज कालच्या व्यस्त जीवनात आणि कार्यशैलीत, चिंता आणि तणावाची समस्या एक सामान्य गोष्ट झाली आहे. तणाव आणि चिंतेची पातळी वाढल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा धोका वाढतो. चिंता आणि तणाव सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतात. ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.

चिंता आणि तणावाचा सामना करण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाय सुचवले जातात. पण, अनेकवेळ हे उपाय कठीण किंवा वेळखाऊ असू शकतात. पण, लेखातून आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने चिंता आणि तणावापासून आराम कसा मिळवता येईल, याची माहिती देणार आहोत.

कोणीही ज्यावेळी चिंताग्रस्त असते तेव्हा श्वासोच्छ्वासाची गती वाढू शकते, यामुळे ताण आणखी वाढतो. 4-7-8 श्वासोच्छवासाचे तंत्राची आरोग्यासह तणाव आणि चिंता करण्यासाठी मदत होऊ शकते.

Easy Tips To Control Stress: टेन्शन काय को लेने का? ताण, तणाव चिंतेवर विजय मिळवण्याच्या 4 सोप्या टेकनिक
Hrithik Tiwari: 'राष्ट्रीय संघापर्यंत पोहण्यासाठी भरपूर पल्ला गाठायचा आहे'; FC Goaचा गोलरक्षक 'ऋतिक' ISL कामगिरीवर समाधानी

4-7-8 श्वास तंत्राचा वापर कसा करावा? ( How To Use Breathing Technique?)


नाकातून ४ सेकंद श्वास घ्या, ७ सेकंद तुमचा श्वास रोखून धरा आणि ८ सेकंद हळूहळू श्वास सोडा. एका अभ्यासानुसार, श्वासोच्छवासाची गती कमी करणे किंवा थांबवणे आणि जलद श्वास घेणे तणाव कमी करण्यासाठी प्रभावी ठरु शकते. यामुळे हृदयाची गती मंदावते आणि मेंदूला आराम मिळण्याचे संकेत मिळतात.

ग्राउंडिंग (What Is Grounding Technique)

ग्राउंडिंग तंत्र आरोग्यासाठी चांगले आहे. यामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत मिळते. या तंत्राला 5-4-3-2-1 असे नाव देण्यात आले आहे.

5 गोष्टी ज्या तुम्हा पाहू शकता

4 गोष्टी ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता

3 गोष्टी तुम्ही ऐकू शकता

2 गोष्टी ज्याचा तुम्ही वास घेऊ शकता

1 गोष्ट तुम्ही चव घेऊ शकता

Easy Tips To Control Stress: टेन्शन काय को लेने का? ताण, तणाव चिंतेवर विजय मिळवण्याच्या 4 सोप्या टेकनिक
Marathi Natak Review: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला; अत्याचारी मॅडम आणि दासी यांच्यातील सत्तासंघर्ष दाखवणारं नाटक

च्युइंगगम चघळा (Chewing Gum)

विचित्र वाटेल, पण च्युइंग गम चघळल्याने चिंताग्रस्त मन शांत होण्यास मदत मिळू शकते. चघळण्याची कृती तुमच्या मेंदूला तुम्ही सुरक्षित ठिकाणी असल्याचा विचार करण्यास प्रवृत्त करते, ज्यामुळे तणावाचे प्रतिसाद कमी होतात.

स्नायूंना विश्रांती द्या (Relax Muscle)

जेव्हा तुम्ही चिंताग्रस्त असता तेव्हा तुमच्या शरीरावरही तणाव वाढतो. स्नायू शिथिल करणे हे एक तंत्र आहे. यात आपण प्रत्येक स्नायू जसे की हात, खांदा किंवा पाय 5 सेकंदांसाठी ताणून नंतर सोडल्याने, तुम्हाला शारीरिक तणावातून मुक्त होण्यास मदत मिळते, आणि मन शांत होते.

Easy Tips To Control Stress: टेन्शन काय को लेने का? ताण, तणाव चिंतेवर विजय मिळवण्याच्या 4 सोप्या टेकनिक
Goa Marathi Language: 'मराठी भाषा घराघरांत, मंदिरांत गेली पाहिजे'; गोवा मराठी अकादमीच्या उपाध्यक्षांना असं का वाटते?

तणावामुळे कोणत्या आजारांचा धोका असू शकतो?

1) हृदयरोग- तणावामुळे हृदयाला जास्त काम करावे लागते, त्यामुळे रक्तदाब वाढतो. यामुळे गुठळ्या आणि हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका वाढतो.

2) साखर- तणावामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

3) लठ्ठपणा- तणावामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com