Hrithik Tiwari: 'राष्ट्रीय संघापर्यंत पोहण्यासाठी भरपूर पल्ला गाठायचा आहे'; FC Goaचा गोलरक्षक 'ऋतिक' ISL कामगिरीवर समाधानी

FC Goa: स्पर्धेतील कामगिरीवर समाधानी असून राष्ट्रीय संघापर्यंत पोहण्यासाठी अजून भरपूर पल्ला गाठायचा आहे, असे मत २३ वर्षीय गोलरक्षक ऋतिक तिवारी याने रविवारी व्यक्त केले.
FC Goa Hrithik Tiwari
FC Goa Hrithik TiwariDainik Gomantak
Published on
Updated on

FC Goa Hrithik Tiwari

पणजी: एफसी गोवाच्या मुख्य संघात नियमित स्थान मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली, संधी नसल्यामुळे दुसरीकडे जाण्याचा विचारही होता, मात्र आता इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील कामगिरीवर समाधानी असून राष्ट्रीय संघापर्यंत पोहण्यासाठी अजून भरपूर पल्ला गाठायचा आहे, असे मत २३ वर्षीय गोलरक्षक ऋतिक तिवारी याने रविवारी व्यक्त केले.

एफसी गोवाचा २०२४-२५ मोसमातील नियमित गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी जायबंदी झाल्यानंतर आणि दुसरा गोलरक्षक लारा शर्मा तंदुरुस्त नसल्याने मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांना पर्याय शोधावा लागला. दोन नोव्हेंबर रोजी फातोर्डा येथे झालेल्या बंगळूर एफसीविरुद्धच्या सामन्यात ऋतिकला गोलनेटचे संरक्षण करण्यासाठी मार्केझ यांनी पाचारण केले.

त्या लढतीत एफसी गोवाने क्लीन शीट राखत सामना तीन गोलने जिंकला आणि नंतर ऋतिकने मागे वळून पाहिलेच नाही. गोलक्षेत्रात तो आता संघाचा आधारस्तंभ बनला आहे. ‘‘संघ चांगला खेळल्याने क्लीन शीट राखणे शक्य झाले. त्यात केवळ गोलरक्षकाचे योगदान नसते, तर बचावपटूंसह हातभार लागतो. अजूनही चांगले खेळायचे आहे,’’ असे आतापर्यंतच्या कामगिरीविषयी ऋतिक म्हणाला.

सलग आठ सामने एफसी गोवाचे गोलरक्षण केल्यानंतर ऋतिक आता आपल्या घरच्या मैदानावर गुवाहाटीत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. एफसी गोवाचा आयएसएलमधील पुढील सामना मंगळवारी (ता. १४) नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल.

FC Goa Hrithik Tiwari
ISL 2024-25: एफसी गोवाच किंग! अग्रस्थानी असलेल्या मोहन बागानला पराभवाचा धक्का; ब्रायसनचे निर्णायक दोन गोल

ऋतिकने १० जानेवारीस २३ वा वाढदिवस साजरा केला. तो मूळचा आसाममधील गुवाहाटीतील, तेथेच त्याचे प्रारंभिक फुटबॉल बहरले. २०१९ साली तो एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघात दाखल झाला. २०२१ मध्ये त्याल एफसी गोवाच्या मुख्य संघात बढती मिळाली. २०२१-२२ मोसमात तो फक्त एकच आयएसएल सामना खेळला. त्यानंतर तो संघाच्या राखीव फळीतच राहिला. आता नियमित खेळाडू बनला असून मंगळवारी गुवाहाटीत मूळ गावी खेळण्याची त्याला संधी मिळत आहे. याविषयी ऋतिक म्हणाला, की ``गुवाहाटीतील स्टेडियमजवळ माझे घर आहे. त्या मैदानावरच माझे फुटबॉल फुलले. आता तेथेच घरच्या लोकांच्या साक्षीने खेळायला मिळतेय हा माझ्यासाठी खूपच खास क्षण असेल.``

FC Goa Hrithik Tiwari
Aren Dsilva : गोमंतकीय फॉरवर्ड आरेन पुन्हा 'FC Goa'च्या जर्सीमध्ये; म्हणाला, "गोवासाठी खेळणे नेहमीच गौरवास्पद"

यावेळची कामगिरी

सामने ः ८, एकूण मिनिटे ः ७२०

क्लीन शीट्स ः ३,

चेंडू अडविण्याची टक्केवारी ः ७५

फटके अडविले ः २२, गोल स्वीकारले ः ७

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com