Hoot Heel Pain Treatment: शरीरात 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढते टाचांचे दुखणे, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

पायांचे टाच हा संपूर्ण पायाचा असा भाग आहे जिथे जास्तीत जास्त वेदना होतात.
Hoot Heel Pain Treatment:
Hoot Heel Pain Treatment:Dainik Gomantak
Published on
Updated on

Hoot Heel Pain Treatment: पायांचे टाच हा संपूर्ण पायाचा असा भाग आहे जिथे जास्तीत जास्त वेदना होतात.पण या वेदना का होतात हे आज जाणून घेउया. तसेच यावर घरगुती उपाय कोणते आहेत हे देखील माहिती करुन घेउया.

टाच दुखणे हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे कारण आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीराचे संतुलन आणि स्नायूंचा त्रास होऊ शकतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे आणि टाचांमध्ये तीव्र वेदना होतात.

  • व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 3 मुळे टाचांमध्ये तीव्र वेदना

व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 3 च्या कमतरतेमुळे टाचांमध्ये प्रचंड वेदना होतात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियम तयार होत नाही आणि व्हिटॅमिन बी 3 च्या कमतरतेमुळे टाचांना भेगा पडू शकते. 

Hoot Heel Pain Treatment:
Food Safety Day: दूध, बटाटे अन् दह्यासोबत 'हे' पदार्थ खाल्यास होऊ शकतात 200 आजार, वेळीच व्हा सावध
  • टाचदुखीचे 'हे' खरं कारण

1. प्लांटर फॅसिटायटिस

प्लांटार फॅसिटायटिस हे टाचदुखीचे एक सामान्य कारण आहे. यामध्ये टाचांची उशी खराब होते, त्यानंतर ऊती आणि स्नायूंमध्ये खूप वेदना सुरू होतात. 

2. संधिवात

संधिवात देखील टाच दुखू शकते.  संधिवात, टाचांच्या उशीवर त्याचा परिणाम होतो. वैद्यकीय भाषेत त्याला टेंडिनाइटिस म्हणतात. यामध्ये सकाळी उठल्याबरोबर घोट्यात तीव्र वेदना होतात. 

3. टाचदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा

टाचदुखीवर औषध घेणे हा उत्तम उपाय नाही. आपण घरगुती उपायांच्या मदतीने ते बरे करू शकता. 

तुमच्या आहार सुधारणा करावी. 

गरम पाण्यात मीठ टाकून काही मिनिटे पाय ठेवावे. 

मोहरीच्या तेलात लसूण टाकून चांगले शिजवून या दुखणाऱ्या टाचांची मसाज केल्यास वेदना कमी होते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com