Food Safety Day
Food Safety DayDainik Gomantak

Food Safety Day: दूध, बटाटे अन् दह्यासोबत 'हे' पदार्थ खाल्यास होऊ शकतात 200 आजार, वेळीच व्हा सावध

आयुर्वेदात काही पदार्थ एकत्र खाल्यास आरोग्यास धोकादायक ठरु शकते. तसेच काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटदुखी आणि 200 आजार होऊ शकतात.
Published on

Food Safety Day: जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 7 जूनला साजरा केला जातो. कारण पोषक पदार्थांचे सेवन न केल्याने अनेक आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, असुरक्षित अन्नामुळे दररोज 1.6 दशलक्ष लोक आजारी पडतात. या सवयीमुळे तुम्हाला डायरियापासून कर्करोगापर्यंत असे 200 आजार होऊ शकतात.

आयुर्वेदात काही पदार्थ एकत्र खाण्यास मनाई केली आहे. कारण, यामुळे खराब पचन, विष तयार होणे, पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता आणि अन्नातून विषबाधा होऊ शकते. अन्न विषबाधा झाल्यास काही लक्षणांवरुन दिसून येते. यामध्ये अतिसार, पोटदुखी, मळमळ, उलट्या, ताप, थंडी वाजून येणे, इ. म्हणूनच खालील पदार्थ एकत्र कधीही खाऊ नका.

Food Safety Day
Sankasti Chaturthi: संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पासाठी बनवा स्वादिष्ट मोदक!
milk
milkDainik Gomantak
  • दुधासह हे पदार्थ खाणे टाळावे

आयुष मंत्रालयानुसार फळे, खरबूज, आंबट फळे, केळी, समोसे, पराठे, खिचडी इत्यादींचे सेवन दुधासोबत करु नका. दूधाचा चही घेतल्यास अनेक आजार होऊ शकता.

  • गहू,ज्वारीसह हे पदार्थ खाणे टाळावे

आपण रोज धान्य खातो आणि कधी कधी त्यासोबत फळेही खातो. आयुर्वेदानूसार फळे आणि साबुदाणासोबत अन्नधान्य खाणे घातक ठरु शकते.

curd
curdDainik Gomantak

जर तुम्ही प्रथिनेयुक्त अन्न सेवन करत असाल तर त्यासोबत काही पदार्थ खाण्याची चूक करू नका. आयुर्वेदानूसार प्रथिने, चरबी आणि स्टार्च पचायला वेगवेगळा वेळ लागतो. म्हणूनच प्रथिनयुक्त अन्नासह चरबीयुक्त अन्न किंवा स्टार्चयुक्त अन्न खाऊ नये.

  • दह्यासह हे पदार्थ खाणे टाळावे

उन्हाळ्यात  (Summer) दही खाणे चांगले असते. कारण पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. पण त्यासोबत चुकीच्या गोष्टी खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. बीन्स, चीज, गरम पेय, लिंबूवर्गीय फळे, आंबा, अंडी आणि मासे दह्यासोबत खाऊ नयेत.

potatoes
potatoesDainik Gomantak
  • बटाट्यासह हे पदार्थ खाणे टाळावे

बटाटे, टोमॅटो, वांगी, सिमला मिरची असे पदार्थ काकडी, खरबूज, दूध-चीज आदींसोबत खाणे टाळावे. कारण यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com