खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे दिवसेंदिवस कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे, असे तज्ञांनी सांगितले आहे. फास्ट फूडचे अतिसेवन केल्यास तुम्ही कोलन कॅन्सर या आजाराला बळी पडू शकता. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, फास्ट फूड खाणाऱ्यांमध्ये कर्करोगाचा धोका इतर लोकांच्या तुलनेत 40 टक्क्यांपर्यंत जास्त असतो. यामध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जास्त प्रमाण आढळते. पोटाच्या कर्करोगाच्या 90 टक्के प्रमाण अयोग्य आहाराशी संबंधित आहेत.
गेल्या काही वर्षांत फास्ट फूडचा ट्रेंड खूप वाढला असून ही चिंतेची बाब आहे. लहान मुलांना या पदार्थांची खूप सवय झाली आहे. पण हे मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. फास्ट फूडमुळे लहान वयात कर्करोगाचा धोका वाढू शकतो. सुरुवातीला पोटदुखीचा त्रास होतो आणि अन्न पचण्यास त्रास होतो. हळूहळू हा आजार पोटात वाढू लागतो. सुरुवातीला लोकांना ते लक्षात येत नाही.
फास्ट फूड बनवण्यासाठी केमिकलचा होतो वापर
प्रसिद्ध झालेल्या एका अहवालनुसार फास्ट फूड बनवण्यासाठी स्वीटनर आणि केमिकलचा वापर केला जातो. यामुळे कर्करोगाचा धोकाही वाढतो. काही फास्ट फूड बनवण्यासाठी तेच तेल अनेक वेळा वापरले जाते. हे तेल हृदयासाठी धोकादायक ठरून आणि कर्करोग पसरण्याचा धोका वाढवते.
अशावेळी लोकांनी फास्ट फूडचे सेवन टाळावे. महिन्यातून एकदा किंवा दोनदा फास्टफुड खाऊ शकता पण तुम्ही जर आठवड्यातून दोन-तीनवेळा फास्ट फूड खात असेल तर त्यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
कोलन कर्करोगाची लक्षणे कोणती
दीर्घकालीन अपचनाची समस्या
बद्धकोष्ठता
भूक न लागणे
अचानक वजन कमी होणे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.