Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन हा सण प्रत्येक भावा-बहिणीसाठी आनंदाचा दिवस असतो. यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे.
हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही मार्केटमधून मिठाई आणल्यापेक्षा घरीच पिस्ता कुल्फी बनवु शकता. ही कुल्फी बनवायला अगदी सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया पिस्ता कुल्फी कशी बनवायची.
कुल्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दूध फुल क्रीम- 1 लिटर
साखर- 1/2 कप
केशर - 1 टीस्पून
हिरवी वेलची - 4 ते 5
बदाम -10 ते 15
पिस्ता बारिक चिरलेला - 3 चमचे
कृती
कुल्फी बनवण्याची सर्वात पहिले एका भांड्यात एक लिटर दूध उकळावे. नंतर ते निम्मे होईपर्यंत उकळावे. दूध थोडे घट्ट झाल्यावर त्याचा रंग बदलू लागतो. दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि केशर घालून 4 ते 5 मिनिटे ढवळावे.
दूध सतत ढवळल्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर टाकावी आणि गॅस बंद करावा. नंतर दुधात बारिक चिरलेला पिस्ता घालावा. कुल्फीमध्ये ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. यानंतर दूध थंड करून कुल्फीच्या साच्यात ठेवा.
आता मोल्ड सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. कुल्फी 4 ते 5 तास सेट केल्यानंतर बाहेर काढावे आणि सर्व्ह करावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कुल्फीवर पिस्ता टाकून गार्निश करू शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.