Thyroid Eye Disease: थायरॉईडमुळे तुमच्या डोळ्याचे आरोग्य येऊ शकते धोक्यात, जाणून घ्या लक्षणे

थायरॉईडचा डोळ्यांशी थेट संबंध आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे.
Thyroid Eye Disease
Thyroid Eye DiseaseDainik Gomantak
Published on
Updated on

Thyroid Eye Disease: डोळे हा शरीराचा सर्वात नाजुक भाग आहे. जर तुम्हाला अॅलर्जी असेल तर त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. शुगर असेल तर थेट परिणाम डोळ्यांवर होतो. अशक्तपणा असल्यास दृष्टी कमजोर होते. असे वेगवेगळे घटक डोळ्यांना त्रास देतात.

पण तुम्हाला माहित आहे का की थायरॉईडमुळे डोळ्याचे आरोग्य खराब होउ शकते. हायपरथायरॉईडीझमची समस्या शरीरात कायम राहिल्यास त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे डोळे आजारी पडू शकतात आणि त्यांचे गंभीर नुकसान होऊ शकते.

  • थायरॉईडमुळे अंधत्व येऊ शकते

थायरॉईड हा एख गंभार आजार आहे. वेळेवर थायरॉईडवर नियंत्रित न ठेवल्यास अंधत्वाची समस्याही उद्भवू शकते. तज्ञ म्हणतात की सामान्यतः रजोनिवृत्तीच्या अवस्थेतून जात असलेल्या महिलांना (Women) डोळ्यांच्या कोरडेपणाचा सामना करावा लागतो.

थायरॉईडमुळे डोळ्यांमध्ये ऑटो इम्यून डिसऑर्डर होतो. यामध्ये, थायरॉईड रिसेप्टर्सच्या विरूद्ध ऑटोअँटीबॉडीज ऑर्बिटल फायब्रोब्लास्ट सक्रिय करतात. यामुळे डोळ्यांच्या निरोगी ऊतींचे नुकसान होते. समस्या वाढली की अंधत्व येते. डोळ्यांमध्ये काही समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Thyroid Eye Disease
Cupid Pizza Recipe: 'या' खास पिझासह स्पेशल बनवा तुमचा व्हॅलेंटाइन डे
face wash
face washDainik Gomantak
  • डोळे कोरडे का पडतात

डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या बालपणात क्वचितच दिसून येते. वाढत्या वयात डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या वाढू लागते. ही समस्या काही लोकांमध्ये खूप सामान्य आहे. पण, या सर्वांव्यतिरिक्त काही आजारांमध्ये डोळ्यांना कोरड्या पडण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते.

यामध्ये ऍलर्जी, थायरॉईड, सजोग्रेन सिंड्रोम, संधिवात आणि व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे डोळे कोरडे होऊ शकतात. त्यांची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे.

  • कोरड्या डोळ्यांवर कोणते उपाय करावे

दुचाकी चालवताना चष्मा किंवा हेल्मेट वापरावे.

कुठे फिरायले गेले असतांना देखील सनग्लासेसचा वापर करावा.

संगणक, लॅपटॉप, मोबाईल वापरताना अधून-मधून ब्रेक घ्यावा.

पाण्याचे सेवन भरपुर करावे.

पुस्तक वाचत असताना डोळ्यांना काही मिनिटे विश्रांती द्या.

दिवसातून एकदा किंवा दोनदा स्वच्छ पाण्याचा डोळे स्वच्छ करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com