Cupid Pizza Recipe
Cupid Pizza RecipeDainik Gomantak

Cupid Pizza Recipe: 'या' खास पिझासह स्पेशल बनवा तुमचा व्हॅलेंटाइन डे

या खास पिझासह तुम्ही व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमच्या जोडीदारासमोर तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.
Published on

दरवर्षी व्हॅलेंटाइन डे हा 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रेमी युगलांसाठी हा दिवस खूप खास असतो. आज आम्ही तुमच्यासाठी खास क्युपिड पिझ्झाची रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी तुमच्या जोडीदारासमोर तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.तसेच त्यांना खास अनुभव देऊ शकता. चला जाणून घेऊया हा पिझ्झा कसा बनवला जातो.

  • पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पिझ्झा बेस - 1

मोझेरेला चीज - 150 ग्रॅम

बारीक चिरलेला टोमॅटो - 1

बारीक चिरलेला कांदा - 1

तुमच्या आवडीच्या इतर भाज्या

टोमॅटो केचप - आवश्यकतेनुसार

Cupid Pizza Recipe
Valentine's Day Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जोडीदाराला द्या 'या' खास अंदाजात शुभेच्छा
  • पिझ्झा बनवण्याची कृती

शेप कटरच्या मदतीने पिझ्झा बेस हार्टच्या आकारात कट करा.

टोमॅटो केचप पिझ्झाच्या बेसवर समान रीतीने पसरवा.

त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो ठेवा.

तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्या जसे की शिमला मिरची, स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न इत्यादी पिझ्झामध्ये घालू शकता.

वर किसलेले मोझेरेला चीज घाला.

हा पिझ्झा ओव्हनमध्ये 20 मिनिटे बेक करा.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ओरेगॅनो टाकून सजवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com