Egg And Bread Morning Breakfast: तुम्हीही ब्रेकफास्टमध्ये अंडी अन् ब्रेड खाता? जाणून घ्या याचे फायदे-तोटे

अंडी आणि ब्रेड दोन्हीमध्ये कॅलरीजचे प्रमाण आढळते.
Egg And Bread
Egg And BreadDainik Gomantak
Published on
Updated on

Egg And Bread Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात अंडी आणि ब्रेड खाणे अनेकांना आवडते. काही लोक हे दोन्ही पदार्थ सँडविच बनवून खातात. तर काही लोकांना वेगळे खायला आवडतात. तुम्हाला हे माहित असेलच की अंडी-ब्रेड हे एक उच्च-कॅलरी अन्न आहे.

हे पदार्थ नाश्त्यात खाल्ल्याने तुम्हाला संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक वाटते. जर तुम्हीही रोज नाश्त्यात अंडी आणि ब्रेड खात असाल तर ही बातमी नक्की वाचा.

USDA च्या मते, अंडी (Egg) आणि ब्रेड या दोन्हीमध्ये कॅलरीजचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. जर तुम्ही त्यांच्या कॅलरीजकडे लक्ष दिले तर तुम्हाला कळेल की त्यामध्ये 250 ते 350 कॅलरीज असतात. 

नाश्त्यात (Breakfast) हे खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि लवकर भूक लागण्याची समस्या येत नाही, म्हणजेच हे खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहू शकते. अंडी-ब्रेडमध्ये प्रथिनेही मुबलक प्रमाणात आढळतात, जे स्नायूंना निरोगी ठेवण्याचे काम करतात आणि बॉडी बिल्डिंगसाठी उपयुक्त आहेत.

  • तोटे काय आहेत?

नाश्त्यात अंडा-ब्रेड खाल्ल्याने काही वेळा आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात. जर तुम्ही रोज ब्रेड खाल्ले तर तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. कारण ब्रेडमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात आणि फायबर खूप कमी असते. हे खाल्ल्याने तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि पोटाशी संबंधित समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात.

Egg And Bread
Father's Day 2023: वयाच्या चाळीशी नंतर 'या' 5 मेडिकल टेस्ट कराच
  • कोणती ब्रेड खावी?

नाश्त्यात मैद्याच्या ब्रेडऐवजी संपूर्ण धान्यापासून बनवलेला ब्रेड खाऊ शकता. कारण त्यात कॅलरी कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने तुमची पचनक्रिया तर ठीक होईलच पण बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल आणि तुमचे पोटही रोज स्वच्छ राहील.

Egg And Bread
Why Hug Is Important: एक जादू की झप्पी... खरंच करु शकते मनाचे दुःख कमी? वाचा एका क्लिकवर

एवढेच नाही तर होल ग्रेन ब्रेड वजन वाढू देत नाही आणि नियंत्रणात ठेवते. याशिवाय मधुमेहाचे रुग्णही याचे सेवन करू शकतात. कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. तुम्ही नाश्त्यात अंडी-ब्रेड खाऊ शकता. पण मैद्यापासून बनलेली ब्रेड खाणे टाळावे. दररोज 2 ब्रेड आणि 2 अंडी पेक्षा जास्त खाऊ नका.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com