Father's Day 2023: वयाच्या चाळीशी नंतर 'या' 5 मेडिकल टेस्ट कराच

वडिलांच्या वाढत्या वयात कोणत्या चाचण्या कराव्यात हे जाणून घेऊया.
Father's Day 2023
Father's Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Medical Tests For Men Above 40s: दरवर्षी 18 जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज जाणून घेऊया की वडिलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी कोणत्या मेडिकल टेस्ट करणे गरजेचे आहे.

तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ तुमच्या वडिलांसाठी काढा आणि त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करा. जर वडिलांचे वय 40 च्या वर असेल तर या चाचण्या करून घेणे खूप चांगले आहे.

  • बोन डेन्सिटी

वयाच्या 40 ते 50 नंतर अनेकांना ऑस्टिओपोरोसिसचा सामना करावा लागतो. हा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे झोपेचा आणि हाडांचा आजार आहे. यामुळे बोन डेन्सिटी टेस्च केल्यास हाडांची ताकद तपासली जाऊ शकते.

  • रक्तदाब

रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह योग्य गतीने होत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी रक्तदाब चाचणी केली जाते. जर रक्तदाब खूप कमी किंवा जास्त असेल तर ते आरोग्यास अनेक आजार निर्माण होऊ शकते.

  • डिजिटल रेक्टल टेस्ट

डिजीटल रेक्टल टेस्ट करून प्रोस्टेट कॅन्सर ओळखता येतो. जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीमध्ये गाठ बाहेर येते तेव्हा हा कर्करोग होतो. अनेक पुरुषांना हा त्रास सहन करावा लागतो. यामुळे ही टेस्ट नक्की करावी.

Father's Day 2023
Father's Day Special Recipe: तुमचे वडिल कॉफी लव्हर आहेत? मग घरीच बनवा कॉफी केक
  • कोलेस्टॉलची टेस्ट

वाढत्या वयानुसार कोलेस्ट्रॉलचा धोकाही वाढू लागतो. कोलेस्टॉल हा चरबीसारखा पदार्थ आहे जो शरीरात तयार होतो. पण जेव्हा त्याचे प्रमाण जास्त वाढते, तेव्हा ते स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्यासह अनेक आरोग्य समस्यांचे कारण बनते.

  • मधुमेहाची टेस्ट

मधुमेह हा आजार सध्या सामान्य आहे. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत अनेकांना होऊ शकतो. मधुमेहामुळे हृदयाच्या समस्या, मज्जातंतूंचे नुकसान, किडनीशी संबंधित आजार आणि दृष्टी समस्या होऊ शकतात. यामुळे रक्तातील साखरेची चाचणी करून घ्यावी जेणेकरून मधुमेहाचा धोकाही लवकर कळू शकेल.

  • फादर्स डे चा इतिहास

19 जून 1910 रोजी अमेरिकेत राहणाऱ्या सोनोरा स्मार्ट डॉड नावाच्या महिलेने आपल्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी पहिल्यांदाच फादर्स डे साजरा केला. सोनोराचे वडील विल्यम्स स्मार्ट यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर 6 मुलांचे संगोपन केले. तिला तिच्या वडिलांच्या समर्पण आणि बलिदानाबद्दल सन्मानित करायचे होते, म्हणून फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला गेला.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com