Mental Health: धावपळीच्या जगात 'असे' मिळवा मानसिक स्थैर्य

आपण पाहिले तर 30 ते 50 वर्ष वयोगटातील व्यक्तींना निरनिराळे रोग जडले आहेत
Mental Health
Mental HealthDainik Gomantak
Published on
Updated on

Mental Stability In Daily Life आज स्पर्धेच्या युगात सर्वांची खूपच धावपळ उडाली आहे. सर्वांना इतरांच्या पुढे जाण्याची इर्षा निर्माण झाली आहे.

सर्वांना इतरांच्या पुढे जाण्याची काळाने इतका झपाट्याने बदल घडवून आणला आहे की आपण कुठेच थांबण्यास तयार नाही, पण हे सर्व करीत असताना आपण आपल्या मनावर शरीरावर ताबा ठेवू शकतो आहोत काय?

धावपळीच्या, दगदगीच्या वेळापत्रकामुळे इतर वेळापत्रक चुकले आहे हे आपल्या ध्यानात येत नाही व जेव्हा येते तेव्हा खूप उशीर झालेला आहे.

आपण पाहिले तर 30 ते 50 वर्ष वयोगटातील व्यक्तींना निरनिराळे रोग जडले आहेत व त्यातल्या त्यात हृदयविकाराने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे.

वेळेवर जेवण घेणे, वेळेवर झोपणे, निरनिराळी व्यसने, बिघडलेले वेळापत्रक यामुळे आपण होऊन ह्या रोगाला आमंत्रण देत आहोत. आपण खूप धावपळ करून पैसा भरपूर कमावू पण ज्या पैशाने मनाला आत्मशांती मिळत नाही.

आपण खाली दिलेल्या बाबींवर लक्ष घातल्यास नक्कीच मनाला शांतता मिळू शकेल असे वाटते.

1) रोज सकाळी चालण्याचा नियमित व्यायाम करावा. तेलकट पदार्थ, गोड पदार्थ शक्यतो टाळून फळे पालेभाज्या यांचा अंतर्भाव असावा.

2) रविवारची सुट्टी पूर्णवेळ कुटुंबासोबत घालवावी. शक्यतो त्यादिवशी जवळपासच्या रम्य ठिकाणी भेट देण्याचा प्रोग्राम आखावा.

3) व्यसनापासून दूर राहावे.

4) वाचन, संगीत ह्यात मन रमवावे. इतरांना मदत करण्याचा भाव मनात असावा.

5) कमाईतील काही हिस्सा चांगल्या सामाजिक कार्यात खर्च करावा.

6) नातेवाईकांच्या संपर्कात राहून दीपावली, नवीन वर्ष, लग्नाचे वाढदिवस अशाप्रसंगी शुभ संदेश पाठवून संवाद साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com