Blood Donation: रक्तदान करताय? जाणून घ्या महत्व आणि फायदे..

रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतातच, याशिवाय रक्तदात्यासही त्याचे आरोग्य सदृढ राहण्याचे फायदे मिळतात.
Blood Donation
Blood DonationDainik Gomantak

रक्तदानाचं महत्त्व साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच रक्तपेढ्या आणि हॉस्पिटल यांच्याकडून वारंवार नागरिकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात येते. रक्तदान करण्यास व रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने १४ जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. (Blood Donation)

रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतातच, याशिवाय रक्तदात्यासही त्याचे आरोग्य सदृढ राहण्याचे फायदे मिळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रक्तसंक्रमणामुळे बर्‍याच लोकांचे व रुग्णांचे प्राण वाचू शकतात, परंतु बहुतेक वेळा रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना योग्य रक्तगट मिळणे तसेच रक्त सहजपणे पडताळून देणे कठीण होते. रक्तदानाचे फायदे खालील प्रमाणे आहेत.

हृदयाचे आरोग्य सुधारते -

रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. शिवाय , हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. रक्तामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यास हृदयाला यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो, असे म्हटले जाते. नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

लाल रक्तपेशींमध्ये वाढ -

रक्तदान केल्यानंतर तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरुन काढण्याचे कार्य सुरू करू लागते . यादरम्यान, शरीरात लाल रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात. यामुळे तुमचे आरोग्य सुधारू लागते आणि शारीरिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं होतात.

Blood Donation
Electricity in Mapusa: म्हापशात भूमिगत वीज वाहिन्यांचे 50 टक्के काम पूर्ण- जोशुआ डिसोझा

कॅन्सरचा धोका कमी -

रक्तदान केल्यानं शरीरात अधिक प्रमाणात असणारे लोह नियंत्रणात आणण्यास मदत होते . यामुळे कॅन्सरचा धोकादेखील कमी होतो.

Blood Donation
ABVP Protest: सेंट झेवियर कॉलेजच्या प्रांगणात 'अभाविप' चे धरणे आंदोलन

आरोग्य तपासणी -

आरोग्यदायी फायद्यांव्यतिरिक्त रक्तदान प्रक्रियेमध्ये रक्तदानापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते , संसर्ग , आजारांची तपासणी केली जाते. रक्तचाचणीद्वारे एखादी व्यक्ती रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही , याची माहिती मिळते. यामुळे नियमित स्वरुपात रक्तदानामुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्यरितीने देखभालही करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com