ABVP Protest: सेंट झेवियर कॉलेजच्या प्रांगणात 'अभाविप' चे धरणे आंदोलन

निवडणूक होऊन देखील अद्याप पदस्थापना सोहळा झालेला नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले
ABVP Protest
ABVP ProtestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा येथील सेंट झेवियर कॉलेजच्या प्रांगणात 'अभाविप' ने आज सकाळपासून धरणे आंदोलन छेडले आहे. निवडणूक होऊन देखील अद्याप पदस्थापना सोहळा झालेला नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाचे स्वरूप पाहता कॉलेजच्या प्रांगणात सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

गेल्या 3 वर्षापासून विद्यार्थी परिषदेच्या नीट निवडणुका झाल्या नाहीत. 2021-22 च्या बॅचसाठी निवडणुका झाल्या पण त्यामध्ये खंडित प्रक्रिया झाली. यंदा निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे लोकशाही पद्धतीने झाली नसली तरी सर्व पदांची निवड झाली. असं असून देखील जवळपास 2 महिने उलटूनही अद्याप पदस्थापना सोहळा झालेला नाही, अशा आशयाचे पत्र विद्यार्थी संघटनेने कॉलेजच्या प्राचार्यांना पाठवले आहे.

क्रीडा उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिमखान्याच्या योग्य सुविधा नाहीत. जिमखाना बहुतांश वेळा बंद असतो आणि विद्यार्थ्यांना तेथे प्रवेशही दिला जात नाही. तथापि, प्रत्येक व्यक्तीकडून संपूर्ण जिमखाना शुल्क घेतले जाते.

एबीव्हीपी कॉलेज युनिटच्या शिष्टमंडळाने गेल्या एक वर्षापासून अनेक समस्यांसह प्राचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्येक वेळी मुख्याध्यापकांनी भेटणे टाळले आहे. प्राचार्यांनी देखील दुर्लक्ष केले आणि निवडून आलेल्या सरचिटणीसकडे जेव्हा मदतीसाठी संपर्क साधला तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

bhom land conversion protest goa
Goa BJP Mahila Morcha Protest
Gyanesh Kumar Resignation Demand Panaji
Karapur One Goa Project Protest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com