Health Tips : नारळ पाण्यापासून बनवलेल्या फेस मास्कचे 'हे' फायदे माहित आहेत का?

माडाच्या झाडापासून तयार झालेले, पूर्ण पक्व फळ म्हणजे नारळ तर कच्च्या फळाला शहाळं म्हणतात.
Health Tips
Health Tips Dainik Gomantak

कल्पवृक्ष म्हणून समजल्या गेलेल्या नारळाचे फायदे सर्वानाच माहित आहेत. माडाच्या झाडापासून तयार झालेले, पूर्ण पक्व फळ म्हणजे नारळ तर कच्च्या फळाला शहाळं म्हणतात. अशक्त व्यक्तींना किंवा शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टर नेहमी नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात.

याबरोबरच लोक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर नारळ पाण्याचे सेवन करतात. नारळाचे पाणी शरीरासाठी इतके फायदेशीर आहे की त्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. याबरोबरच नारळामध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि फायटोकेमिकल्स असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात.

पण तुम्हाला माहित आहे का की फक्त नारळ पाणी पिण्याचे नाही तर त्याचा फेस मास्क लावल्याने तुमच्या त्वचेसाठी अनेक फायदे होतात. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया हा फेस मास्क तुम्ही घरी कसा बनवू शकता आणि यामुळे तुमच्या चेहऱ्याला आश्चर्यकारक फायदे मिळतात.

Health Tips
Makar Sankranti: मकर संक्रांत आणि सूर्य उपासना, नक्की काय आहे संबंध, वाचा सविस्तर..

नारळ पाणी त्वचेसाठी उत्तम-

नारळ पाणी तुमच्या त्वचेशी संबंधित समस्या दूर करते. नारळाच्या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात पोटॅशियम असते आणि ते आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ ठेवते. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांसारख्या समस्या असतील तर नारळाच्या फेस मास्कचा तुम्हाला खूप फायदा होईल. नारळाचे पाणी शरीरातील PH पातळी संतुलित करण्यास देखील मदत करते.

Health Tips
Makar Sankranti: प्रत्येक महिन्यात एक रास बदलणाऱ्या सूर्याचे पौषातील मकर राशीत भ्रमण का महत्वाचे? वाचा...

फेस मास्क असा बनवा-

फेस मास्क बनवणे खूप सोपे आहे. हे करण्यासाठी एका भांड्यात शहाळ घ्या आणि नंतर त्यात गुलाब पाणी घालून मिक्स करा. हा तयार झालेला फेस मास्क कापसाच्या मदतीने चार ते पाच वेळा करा. आता चेहरा धुवा आणि चेहरा धुतल्यानंतर तुमची त्वचा सॉफ्ट वाटेल.

Health Tips
Makar Sankranti 2023: मधुमेहींसाठी बनवा खास शुगर फ्री तिळाची चिक्की

पिंपल्सपासून आराम मिळेल-

पिंपल्स किंवा डागांची समस्या असो, नारळाचा फेस मास्क तुम्हाला खूप आराम देईल. नारळपाणी आणि गुलाबपाणीमध्ये असलेले घटक त्वचेला तजेलदार बनवण्याचे काम करतात. हे लावल्याने तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. हायड्रेटेड स्किन हे चेहऱ्यावरील ग्लो चे रहस्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com