Makar Sankranti: प्रत्येक महिन्यात एक रास बदलणाऱ्या सूर्याचे पौषातील मकर राशीत भ्रमण का महत्वाचे? वाचा...

सूर्य धनु राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात.
Makar Sankranti
Makar SankrantiDainik Gomantak

प्रत्येक महिन्यात सुर्य एक रास बदलतो. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिष शास्त्रात संक्रांत म्हंटले आहे. सूर्य धनु राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ हा सौर मास (महिना) म्हणून ओळखला जातो.

कर्क आणि मकर राशीत सूर्याचा प्रवेश धार्मिक दृष्टीने अत्यंत शुभ मानला गेला आहे. ही प्रवेश क्रिया सहा-सहा महिन्याच्या अंतराने होते. भारत उत्तर गोलार्धात स्थित आहे. मकरसंक्रांतीपुर्वी सूर्य दक्षिण गोलार्धात असतो, म्हणजे भारतापासून दूर असतो. या काळात सूर्य दक्षिणायनात असतो. याच कारणामुळे या काळात रात्र मोठी आणि दिवस लहान असतो तसेच थंडी राहते. परंतु मकरसंक्रांतीपासून सूर्य उत्तर गोलार्धाकडे येण्यास सुरुवात होते. यालाच उत्तरायण म्हणतात. या काळात रात्र छोटी आणि दिवस मोठा असतो तसेच उन्हाळा सुरु होतो.

वर्षभरात बारा राशींतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली, तरी भारतीय लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता यांचा लाभ होतो. त्यामुळेच त्यांना मकर संक्रमण उत्सवाच्या स्वरूपात अधिकच आनंददायक वाटते. पूर्वी उत्तरायणाचा प्रारंभ हाच वर्षारंभ असावा इ. प्रकारची मते आढळतात. 

Makar Sankranti
Pongal Festival: 'पोंगल' म्हणजे काय; जाणून घ्या या सणाचं महत्त्व

सामाजिकदृष्ट्या महत्त्व-

हा सण माणसांच्या परस्परसंबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. तिळगूळ देताना ’तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत, विविध वस्तूंचे दान देण्याचा आग्रह, दूरच्या संबंधितांना शुभेच्छापत्रे व तिळगूळ वगैरे पाठविण्याची पद्धत, सुवासिनींनी आपल्या घरचे तांदुळ दुसऱ्यांच्या घरच्या आधणात शिजविण्याची व दुसऱ्यांच्या घरात असोला नारळ सोडण्याची कोकणातील प्रथा इ. गोष्टी सामाजिक अभिसरणाच्या द्योतक आहेत.  

Makar Sankranti
Bhogi Bhaji Recipe: आज तयार करा भोगीची स्पेशल भाजी, जाणून घ्या महत्व

आहारदृष्ट्या महत्त्व-

हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ-बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो. तीळ वापरण्यामागचा दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com