भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आणि उत्सव हे सूर्यावर आधारित आहेत. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण. ही क्रिया मकर राशीत होते तेव्हा त्याला मकर संक्रांत म्हणतात. मकर संक्रांतीपासून मकर राशीतील सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरू करतो, याला सूर्याची उत्तरायण म्हणतात.
मकर संक्रांत हा मुळात सूर्याच्या उपासनेचा सण आहे. मकर संक्रांतीचा सण जीवनातील विविध परिस्थितींमध्ये सूर्याच्या भूमिकेचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. या उत्सवात निसर्गाचा कारक म्हणून सूर्यदेवाची पूजा केली जाते. सूर्य हा शास्त्रामध्ये भौतिक आणि अभौतिक घटकांचा आत्मा मनाला जातो.
वैदिक काळापासून भगवान सूर्याच्या उपासनेचा उल्लेख आहे. ऋग्वेदात सूर्याला अचल आत्मा म्हटले आहे. वैदिक काळापासून आतापर्यंत सूर्याला जीवन, आरोग्य आणि शक्तीची देवता म्हणून ओळखले जाते. पुराणात सूर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत, ज्यात त्यांचे स्थान आणि महत्त्व वर्णन केले आहे. अशी श्रद्धा आहे की, सूर्याशी संबंधित कथा श्रवण केल्याने पाप आणि दुःखापासून मुक्ती मिळते आणि माणसाचे पुनरुत्थान होते. आपल्या ऋषीमुनींनी देखील उगवत्या सूर्याला ज्ञानरूपात देव मानून सूर्याची उपासना करण्याचे सांगितले आहे.
नऊ ग्रहांपैकी पहिला ग्रह सूर्य आहे. विश्वाच्या जीवनात ग्रहदेवतेबरोबरच सूर्याचेही महत्त्वाचे योगदान आहे. डोळे, डोके, दात, नाक, कान, रक्तदाब, हाडांचे आजार, नखे, हृदय यांवर सूर्याचा प्रभाव पडतो. माणसाला सूर्य जर प्रथम, द्वितीय, पाचव्या, सप्तमात असतो तेव्हाही या समस्या उद्भवतात. ज्यांना अपत्य होत नाही, त्यांना सूर्य साधनेचा लाभ होतो. पिता-पुत्राच्या नात्यातील विशेष लाभासाठी पुत्राने सूर्य साधना करावी.
जर कोणी प्रत्येक रविवारी सूर्याच्या मंत्राचा 11 वेळा जप केला तर तो व्यक्ती यशस्वी होतो. त्याला प्रत्येक कामात यश मिळते. सूर्याची उपासना सूर्य, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाद आणि कृतिका नक्षत्रात केल्यास अनेक लाभ होतात. सूर्याच्या या नक्षत्रांमध्येच सूर्यासाठी दान करावे. संक्रांतीचा दिवस सूर्य साधनेसाठी, सूर्याच्या प्रसन्नतेत दानधर्म करण्यासाठी सर्वोत्तम आहे.
सूर्यदेवाला नेहमी पूर्व दिशेला जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना दोन्ही हातांनी तांब्याचे भांडे धरून डोक्यावरून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. भांड्यात पाण्यासोबत लाल फुले, कुंकू आणि तांदूळ घाला. सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्या मध्यभागी सूर्यकिरण येत असल्याचे पाहा. अर्घ्य देताना सूर्याच्या मंत्राचा जप करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.