
Diabetes Drug SGLT2 Inhibitor Reduces Heart Failure Risk In Cancer Patients
देशात गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यादरम्यान कर्करोगाच्या रुग्णांमध्ये हार्ट फेलियरची समस्या देखील दिसून आली आहे. यामुळे अनेकदा कर्करोगाच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. याचदरम्यान आता एका अभ्यासातून मोठा खुलासा झाला आहे. मधुमेहाचे एक खास औषध, SGLT2 इनहिबिटर कर्करोगाच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका 50 टक्क्यांनी कमी करु शकते आणि उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारु शकते, असे अभ्यासातून समोर आले आहे.
कर्करोगाच्या उपचारासाठी दिल्या जाणाऱ्या केमोथेरपीचा शरीरावर खोलवर परिणाम होतो. कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासोबतच, त्याचा हृदयावरही देखील परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. संशोधनानुसार, केमोथेरपीनंतर 20 टक्के कर्करोगाच्या रुग्णांना हृदयरोग होतो, त्यापैकी 10 टक्के रुग्णांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, परंतु नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, जर मधुमेहाच्या रुग्णाला कर्करोग असेल आणि तो मधुमेहाचे औषध घेत असेल तर हृदयविकाराचा धोका 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
यूकेमधील ईस्ट अँग्लिया विद्यापीठातील संशोधकांनी या विषयावर एक सविस्तर अभ्यास केला. यामध्ये, हृदयविकार रोखण्यासाठी मधुमेहाचे SGLT2 इनहिबिटर हे औषध प्रभावी ठरत असल्याचे आढळून आले. हा अभ्यास युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.
संशोधकांनी 88,273 कर्करोग रुग्ण आणि कर्करोगातून वाचलेल्यांचा समावेश असलेल्या 13 अभ्यासांचे विश्लेषण केले. हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 50 टक्के कमी झाल्याचे आढळून आले. हृदयविकाराच्या नवीन प्रकरणांमध्ये 71 टक्के घट झाली. हे औषध स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी विशेषतः फायदेशीर ठरत असल्याचे आढळून आले.
या अभ्यासाचे प्रमुख संशोधक प्रोफेसर वासिलीओस वासिलीओ यांच्या मते, “SGLT2 इनहिबिटर औषधे आधीच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमध्ये उपयुक्त सिद्ध झाले आहेत. यामुळे श्वास घेण्यास त्रास, थकवा, हार्ट फेलियर यासारख्या समस्या कमी होऊ शकतात आणि रुग्णांना अधिक निरोगी वाटू शकते.
जरी हा रिझल्ट आशादायी असला तरी, संशोधकांचे म्हणणे आहे की, कर्करोगाच्या रुग्णांसाठी हे औषध मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ शकेल यासाठी पुढील सखोल अभ्यास आवश्यक आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.