Cancer: शरीरातील गाठ कर्करोगाची आहे की नाही हे कसे ओळखायचे? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Types Of Lumps In The Body: भारतात दरवर्षी कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2023 मध्ये देशात या आजाराचे 14 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले.
Types Of Lumps In The Body
CancerDainik Gomantak
Published on
Updated on

Not All Lumps Are Cancerous: Types, Causes & When to Worry

भारतात दरवर्षी कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2023 मध्ये देशात या आजाराचे 14 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. कर्करोगाचे बहुतेक रुग्ण शेवटच्या टप्प्यात आढळतात. याचे कारण म्हणजे लोकांना या आजाराची लक्षणे माहित नसणे. कर्करोगाच्या बाबतीत, शरीरात एक गाठ देखील तयार होते. पण प्रत्येक गाठ कर्करोगाची असते का? हे कसे ओळखायचे? चला तर मग याबाबत तज्ञांकडून जाणून घेऊया.

प्रत्येक गाठ कर्करोगाची नसते

गुरुग्राममधील कर्करोग तज्ज्ञ डॉ. रोहन खंडेलवाल यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात गाठ तयार झाली तर त्याला कर्करोगाचा धोका असतो. पण प्रत्येक गाठ कर्करोगाची नसते. शरीरात अनेक प्रकारच्या गाठी असतात. यापैकी बहुतेक जीवघेण्या ठरत नाहीत. संसर्ग किंवा दुखापतीमुळे त्वचेखाली फ्लूइडने भरलेल्या पिशव्या तयार होऊ शकतात. याला 'सिस्ट' म्हणतात. ते गाठीसारखे दिसते, पण ते कर्करोगाचे (Cancer) कारण ठरु शकत नाही. काही रुग्णांमध्ये बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे या गाठी दिसतात, ज्या वेदनादायक आणि लाल असू शकतात. पण या गोष्टींनी घाबरु नये.

Types Of Lumps In The Body
Blood Cancer: ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष करणं प्राणघातक ठरू शकतं

हार्मोन्समधील बदलांमुळेही गाठी तयार होतात

डॉ. खंडेलवाल यांनी पुढे सांगितले की, हार्मोनल बदलांमुळे महिलांच्या स्तनांमध्ये गाठी तयार होऊ शकतात, ज्या मासिक पाळी दरम्यान वाढतात आणि कमी होतात. यास 'फायब्रोसिस्टिक' म्हणतात. अशा गाठी कर्करोगाच्या नसतात आणि कालांतराने त्या स्वतःहून निघून जातात. पण जर एखादी गाठ वेगाने वाढत असेल आणि बराच काळ म्हणजे एक ते दोन महिने टिकून राहिली तर तात्काळ डॉक्टरांचा (Doctors) सल्ला घेतला पाहिजे. बहुतेक कर्करोग नसलेल्या गाठी मऊ आणि गुळगुळीत असतात, तर कर्करोगाच्या गाठी कठीण आणि घन असतात. जर गाठीचा त्वचेचा रंग बदलला आणि अल्सर सारखे काही वाटले तर ती कर्करोगाची गाठ असू शकते.

Types Of Lumps In The Body
Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर गाठ कायम राहिली किंवा आकार वाढला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर गाठीसोबत अचानक वजन कमी होत असेल तर ते देखील लक्षात ठेवा. याशिवाय, जर तुम्हाला सतत ताप आणि सतत थकवा येत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. या बाबतीत निष्काळजी राहू नका. हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com