केसांच्या वाढीसाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. त्यात खोबरेल तेल महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कारण खोबरेल तेलात अनेक गुणधर्म आहेत, जे केसांवरील समस्या सोडवण्यासाठी मदत करतात. खोबरेल तेल अनेक कारणांसाठी वापरण्यात येतो. हे तेल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे तेल सेवन केल्याने आपल्याला अनेक आजारांचा सामना करण्यास मदत करते. रक्त पुरवठा, अतिरिक्त चरबी, विविध संसर्गाशी लढणे यांच्यावर रामबाण उपाय हा खोबरेल तेल ठरला आहे. चला तर मग, या तेलाचे थोडक्यात महत्त्व जाणून घेऊयात.
फॅट बर्निंगला प्रोत्साहन देते-
या तेलात अनेक उत्तम गुणधर्म आहेत, जे आपल्या शरीरासाठी आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरू शकतात. शरीरातील जळजळ कमी करणे, थायरॉईड/मेटाबॉलिज्म कमी करणे अश्या विविध उपायांसाठी मदत करते. या तेलात असलेल्या एंटीमाइक्रोबियल आणि एंटीऑक्सीडेंट गुणधर्मांमुळे वजन कमी करण्यास मदत करते.
संसर्गाशी लढण्यास मदत-
नारळाच्या तेलामध्ये लॉरिक ऍसिड असते आणि शरीर लॉरिक ऍसिडचे मोनोलॉरिनमध्ये रूपांतर करते, ज्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात आणि ते बॅक्टेरियाशी लढण्यास उत्कृष्ट असतात.
कोलेस्टेरॉल कमी करते-
दररोज नारळाच्या तेलाचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलचे प्रेग्नेनोलोन आणि प्रोजेस्टेरॉनमध्ये रूपांतर होऊन त्याचे प्रमाण सामान्य पातळीवर येऊ शकते. त्यामुळे हे तेल नियमित जेवणामध्ये वापर केल्यास शरीरासाठी उत्तम ठरेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.