Health Tips: पाठदुखीपासून दूर राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स...

पाठदुखीचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील स्नायूंचा असमतोल. तसंच चुकीच्या पद्धतीनं शरीराची खासकरून पाठीच्या कण्याची हालचाल केल्यामुळे पाठदुखी संभवते.
Health Tips
Health TipsDainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री-पुरुष, मुलं-मुली, तरुण-तरुणी आणि वयस्कर-वृध्द कोणालाही पाठदुखीचा त्रास संभवतो. मात्र मध्यमवयातच पाठदुखीची सुरुवात होण्याचं प्रमाण जास्त आढळतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपल्या पाठीचा कणा जपणं आवश्यक आहे. पाठीचा कणा हा शरीराचा मध्यवर्ती अक्ष आहे.

पाठदुखीचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील स्नायूंचा असमतोल. तसंच चुकीच्या पद्धतीनं शरीराची खासकरून पाठीच्या कण्याची हालचाल केल्यामुळे पाठदुखी संभवते. पाठीच्या कण्याचा सर्वसाधरण संरचना ही 'एस' या अक्षरासारखी असते. अनेकदा एकाच अवस्थेत खूप वेळ बसल्यामुळे किंवा पाठीवर अधिक ताण आल्यामुळे पाठदुखी होते.

जसं की नोकरीच्या ठिकाणी खुर्चीत दिवसभर बसणं. पाठीच्या दुखण्यामुळे आपण फारसा व्यायाम करत नाही आणि व्यायामाच्या अभावामुळे स्थिती अजूनच गंभीर होतं जाते. पाठीदुखीकडे दुर्लक्ष करून योग्य तो व्यायाम न केल्यामुळे वेदना अधिक वाढण्याची शक्यता असते. कणा, स्नायू, अस्थिबंध आणि सांधे निरोगी ठेवण्यासाठी योग्य हालचाल आणि व्यायाम आवश्यक आहे.

Health Tips
Peanut Side Effects : या लोकांसाठी शेंगदाणे ठरू शकतात घातक; जाणून घ्या

दिवसभर कामानिमित्त खुर्चीवर बसून राहणं, प्रवासा दरम्यान पाठीची चुकीच्या पद्धतीनं हालचाल होणं, अधिक वजन उचाल्यामुळे, अशा अनेक कारणांमुळे आपल्याला पाठदुखीला सामोर जावं लागतं. त्यामुळे पाठ टेकण्यासाठी आरामदायी आधार असलेल्याच खुर्चीचा वापर घरी किंवा ऑफिसात बसण्यासाठी करा. प्रवासादरम्यान अतिजड वस्तू उचलणं टाळा. घाईघाईत शरीराची हालचाल करू नका.

Health Tips
Mental Health Tips : आयुष्यात पॉझिटीव्ह राहण्याचा सिंपल फंडा! या घातक गोष्टी बोलणे थांबवा

पाठदुखी टाळण्यासाठी काही टिप्स-

  • बसण्याचा चांगला पवित्रा ठेवा. ताठ पण आरामशीर उभे राहा.

  • एकाच जागी अधिक वेळ बसून राहणं टाळा. कामादरम्यान मध्ये-मध्ये थोडा ब्रेक घेऊन जागेवरच उभं राहा.

  • तुम्हाला आरामदायी असेल अशाच पादत्राणांचा वापर करा. अधिक उंच हिल्समुळे देखील पाठदुखी होते.

  • कम्प्युटरवर काम करताना, कम्प्युटर स्क्रीनची स्थिती डोळ्यांच्या सरळ रेषेत असावी. जेणेकरून पाठीचा कणा, मान न वाकवता काम करता येईल.

  • नियमित मुलभूत व्यायाम करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com