Cold Wave : वातावरणात होतोय बदल! श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला...

हिवाळ्यात हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या खूप वाढली आहे.
Cold Wave
Cold Wave Dainik Gomantak
Published on
Updated on

Air Pollution : देशभरात सध्या थंडीची लाट सुरु आहे. देशातील काही भागात 6 ते 9 अंश सेल्सि. एवढे तापमान खाली आले आहे. मुंबई, नवी मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिल्लीच्या हवेप्रमाणे ढासळली आहे. राजधानी दिल्लीत थंडीने अनेक विक्रम मोडले आहेत. महाराष्ट्रातही पारा कमालीचा घसरला आहे. थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हिवाळ्यात हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या खूप वाढली आहे. त्याचप्रमाणे फुफ्फुस आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना देखील काळजी घेण्याची गरज आहे. हवामानाचा परिस्थिती अशीच राहिल्यास संपूर्ण जानेवारीत मुंबईकरांना खराब हवामानाचा त्रास सहन करावा लागू शकतो, असे तज्ञानी सांगितले आहे.

आरोग्याची घ्या काळजी-

डॉक्टरांच्या मते, कडाक्याच्या थंडीत लोकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास, श्वसनाचे विकार आणि ह्रदयासंबंधित समस्या असणाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर थंडीच्या लाटेत सकाळी बाहेर पडणे आणि व्यायाम करणे टाळावे तसेच उबदार कपडे घालावेत.

Cold Wave
Vastu Shashtra : बेडरूमची सजावट 'अशी' करा आणि नात्यामधील तणावाचे प्रसंग टाळा..

खाण्यापिण्याच्या सवयी-

हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या ऋतूमध्ये कित्येक प्रकारच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारामध्ये अख्खे कडधान्य, दलिया इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात. तसंच हिवाळ्यामध्ये अधिक प्रमाणात भाज्या आणि फळांचं सेवन करावे.

Cold Wave
Health Tips: टाचदुखीने त्रस्त आहात? करा घरच्या घरी 'हे' उपाय

व्यायामाची आवश्यकता -

शरीर फिट राहण्यासाठी आहारासोबतच नियमित व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे. शरीराची योग्य पद्धतीनं हालचाल होणं आवश्यक आहे. आपल्या फिटनेससाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन नियमित व्यायाम करावा. जिममध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य नसल्यास तुम्ही चालण्याचा साधा आणि सोपा व्यायाम करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com