Bra Syndrome: महिलांना अनेक वेळा हात, मान आणि खांदे दुखीची समस्या जाणवते. त्यामागचे कारण 'ब्रेसियर' असू शकते. होय, अनेक महिलांना हे देखील कळत नाही की त्यांनी घातलेल्या 'ब्रेसियर' चा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. तुम्हाला हे वाचून विचित्र वाटत असेल, पण प्रत्यक्षात 'ब्रेसियर' चे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात.
'ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम' याला वैद्यकीय भाषेत कॉस्टोक्लाव्हिक्युलर सिंड्रोम असेही म्हणतात. जड स्तन असलेल्या स्त्रिया जेव्हा पातळ स्ट्रिप 'ब्रेसियर' घालतात तेव्हा त्यांच्या स्तनांचा सर्व भार ब्रेसियर वर येतो. यामुळे ब्रेसियरच्या पट्ट्या खांद्यावरून खेचू लागतात आणि त्यांच्यावर जास्त दबाव येतो. यामुळे तुमचे खांदे दुखू लागतात. ही समस्या सामान्यतः पातळ पट्ट्याची ब्रेसियर घातल्याने होते.
दैनंदिन कामे करताना होते त्रास
ब्रेसियरच्या पट्ट्यांमुळे खांद्यावर दबाव येतो आणि मान, खांदा, पाठ आणि हात दुखू लागतात. ब्रामुळे होणारी अस्वस्थता बहुतेक लठ्ठ, जड स्तन असलेल्या महिलांमध्ये दिसून येते. 'ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम' ग्रस्त महिलांना अनेकदा मान आणि खांदे दुखीला सामोरे जावे लागते. कधी-कधी या दुखण्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करण्यातही खूप अडचणी येतात.
वेदनापासून मुक्त कसे व्हावे?
ब्रेसियरमुळे होणा-या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कधीही टाइट ब्रेसियर घालू नका. तसेच कपचा आकार नेहमीच लक्षाच ठेवी आणि पातळ पट्टा असलेली ब्रेसियर रोज घालणे टाळावे.
रात्री झोपण्यापुर्वी नेहमी आपली ब्रेसियर काढून मोकळे झोपावे.
जेव्हा घरी असता तेव्हा ब्रेसियर घालणे टाळावे.
ब्रेसियर घालण्यासाठी तुम्ही शोल्डर पॅड वापरू शकता. यामुळे खाद्यांवर पट्ट्यामुळे होणारे लाल जाग कमी होतील.
पाठदुखी टाळण्यासाठी क्रॉस पट्टी असलेली ब्रेसियर घालावी.
ब्रेसियरच्या कपच्या आखाराची विशेष खाळजी घ्यावी.
चुकीच्या साइजची ब्रेसियर घातल्यास वेगना होऊ शकतात.
अंडर वायर ब्रेसियर घातल्याने मज्जातंतूसाठी घातक ठरू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.