
तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या शरीरात जर का कुठल्या भलत्याच ब्लड ग्रुपचं रक्त चढवलं तर त्याचे परिणाम काय होतील?खरं तर आपल्या शरीरातील पेट्रोल म्हणजे रक्त, रक्त कमी झाल्यास झटकन चक्कर येऊन माणूस कोसळून पडू शकतो. बघा, जेव्हा कधीही आपल्याला खूप मोठी रोगराई ग्रासते तेव्हा डॉक्टर देखील ब्लड टेस्ट करायचा सल्ला देतात. आपल्या शरीरात रक्त हा घटक फार महत्वाचा असतो. पण मग एखाद्यावेळी दुसऱ्या कुणाचं रक्त आपल्या शरीरात चढवलं तर काय होईल? रक्त तर रक्त आहे मग ब्लड ग्रुपनुसार त्याची विभागणी का केली जाते?
सर्वात आधी लक्षात घ्या माणसाच्या शरीरात A, B, AB आणि O असे ब्लड ग्रुपचे प्रकार असतात आणि प्रत्येक माणसाच्या शरीरात यांपैकी एकाच ब्लड ग्रुप तुम्हाला आढळून येईल. आपले रक्त अनेक प्रकारच्या पेशी आणि द्रवपदार्थाने बनलेले असते. आणि या द्रवाला प्लाझ्मा असं म्हणतात.
या पेशींवर विशिष्ट प्रकारचे पदार्थाचा थर असतो ज्याला एंटीजन म्हणतात. हे एंटीजन एखाद्या व्यक्तीचे रक्त कोणत्या प्रकारचे आहे, म्हणजेच त्याचा रक्तगट काय आहे हे सांगतात.
एखाद्या व्यक्तीला जर का रक्ताची आवश्यकता असल्यास आधी ब्लड टेस्ट करून ब्लड ग्रुप शोधून काढला जातो कारण ब्लड ग्रुप माहिती नसताना रक्त चढवल्यास माणसाचा जीव देखील जाऊ शकतो. चुकीच्या ब्लड ग्रुपमधल्या रक्तामुळे शरीरातील रक्तासोबत एक ट्रान्सफ्युजनल रिऍक्शन तयार होते. कधीकधी तोच ब्लड ग्रुप देखील वापरल्याने एलर्जी होऊ शकते तेव्हा नंतर डॉक्टर एंटीबायोटिक औषध देतात. आपल्याला शरीराला नवीन चढवलेल्या रक्तचाच अंदाज येत नाही आणि शरीर स्वतः विरुद्ध एंटीबॉडी तयार करू लागतं, हे भरपूर हानिकारक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.