आजकाल, नैसर्गिकरित्या, शरीराच्या ऑक्सिजनची(Oxygen) पातळी वाढवणे ही सर्वात मोठी गरज आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे कोरोनाच्या रूग्णांना सर्वाधिक त्रास होत आहे. तेव्हा आता कोरोनाव्हायरसला(Coronaviras) पूर्णपणे हरविण्यासाठी आपल्याला योग्य आहाराची तंदुरुस्त राहण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात जास्त काय आवश्यक आहे हे आपण जाणून घेवूया. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आपल्या शरीराची ऑक्सिजन लेवल मेंटेन ठेवणं गरजेच आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या शरीरात ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी आपल्या आहारात(Food) काही पदार्थ समाविष्ट करणे आवश्यक आहे.(Health Tips Include these 10 foods in your diet and naturally increase oxygen levels)
1.काळा हरभरा
काळ्या हरभऱ्यात लोहाचे प्रमाण जास्त असते. हा हरभरा ऑक्सिजन वाढविण्यासाठी एक चांगला स्रोत आहे आणि त्याचे सेवन करणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळा हरभरा शरीरातील ऑक्सिजनची पातळी मेंटेन ठेवतो. आपल्या रोजच्या आहारात काळ्या हरभराचा समावेश करा.
2. संत्रा
संत्रामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हिवाळ्याच्या दिवसातही संत्री खाणे फायदेशीर ठरते. संत्रामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. विविध पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण असल्याने संत्रा अनेक मोठ्या आजारांना बरे करण्यास तसेच शरीराच्या ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात मदत करते. आपल्या नियमित आहारात याचा समावेश करा.
3. टरबूज
टरबूज खाणे म्हणजे जास्तीत जास्त पाणी पीणे, जे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए सारख्या पौष्टिक तत्त्व शरीरात रक्ताची कमतरता भरून काढते आणि ऑक्सिजनची पातळी राखण्यास मदत करतात.
4 स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडेंट तत्व आणि पॉलीफेनॉल संयुगे असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात असलेले व्हिटॅमिन-सी घटक शरीरातील अनेक पौष्टिक घटकांची कमतरता पूर्ण करण्यात मदत करतात. दररोज स्ट्रॉबेरी खाल्याने शरीरात ऊर्जा आणि ऑक्सिजनची पातळी कायम राखली जाते. कोरोनाच्या रूग्णांनीदेखील आपल्या आहारात स्ट्रॉबेरीचे समावेश केला पाहिजे.
5. ऍपल
सफरचंदमध्ये पुरेशा प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स आणि रोगप्रतिकारक घटक असतात. काही असे घटक सफरचंदांमध्ये आढळतात जे शरीरात नवीन पेशी तयार करण्यात मदत करतात. त्यामुळे सफरचंद सेवन केल्याने शरीराची ऑक्सिजन पातळी टिकून राहते.
6. किवी
किवीमधील अॅक्टिनिडिन नावाचा पदार्थ शरीरात द्रव्य निर्माण करतो. जे शरीरातील प्रथिने पचन करण्यास मदत करते. याबरोबरच, किवीमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी शरीराला कोरोनाव्हायरसपासून दुर होण्यास मदत करते. किवीचे सेवन हा कोरोना रूग्णांसाठी रामबाण उपाय आहे. त्याचबरोबर किवी खाल्याने शरीरास ऊर्जा मिळते, आणि ऑक्सिजनची पातळी राखली जाते.
7. आंबा
व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सीने समृद्ध असलेल्या आंब्याचे सेवन केल्याने शरीरातील बर्याच रोगांपासून आपला बचाव होतो. आंबा खाल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती विकसित होते, जी बर्याच रोगांशी लढायला मदत करते. आणि आंब्याच्या सेवनाने शरीराची ऑक्सिजन पातळी देखभाल होते.
8. आवळा
आवळा अँटी-ऑक्सिडेंट घटकांसह समृद्ध आहे, तसेच व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत म्हणून आवळा खाल्ला जातो. आवळा खाल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनते. इतकेच नव्हे तर शरीरात ऑक्सिजनची लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आवळाची महत्वाची भूमिका असते. आपल्या नियमित आहारात आवळ्याचा समावेश करा.
9. भाजलेले जिरे
भाजलेले जिरे शरीराची ऑक्सिजन पातळी मेंटेन ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते. त्यात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे भाजलेले जिरे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते. त्याचबरोबर ऑक्सिजनची लेवल वाढविण्यासाठी तुम्ही जिरे तळून घ्या घेवू शकता पण त्यात मीठ घालू नका.
10. व्हिटॅमिन डी
शरीराची ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी, आपल्या आहारात व्हिटॅमिन-डी जास्त प्रमाणात पोषक घटकांचा समावेश करा. या घटकांमधून शरीराला ऊर्जा मिळविण्यास मदत होते आणि कोरोना आजारापासून दुर ठेवण्यासाठी देखील मदत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.