
What Married Woman Search in Google: सर्च इंजिन गुगलवर लोक अनेक प्रकारच्या गोष्टी शोधतात.प्रत्येक व्यक्ती आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी गुगल सर्च ही करतात. मात्र महिला लग्नांनतर अशा काही गोष्टी सर्च करतात ऐकून पुरुष मंडळी ही थक्क होत आहेत. तर काहीना हसू आवरेनासं झालंय. एका संशोधनानुसार ही गोष्ट समोर आली आहे. (According to one report Married Women search on Google these shocking things )
बसल्याजागी कोणतंही उत्तरं मिळवण्यासाठी लोकं गुगलकडे वळतात. काही प्रश्न हे माहिती देण्यास भाग पाडणारे असतात. तर काही प्रश्न तर खूप अतरंगी असतात जे कोणाला विचारता येतील हे सांगता येत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का लग्न झाल्यावर स्त्रिया गुगलवर सर्वाधिक व वारंवार काय सर्च करतात ? नसला विचारला तर बातमीचा पुढील वृत्तांत आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे.
विवाहित स्त्रिया पतीबाबत अनेक गोष्टी गुगल सर्च करतात
मिळालेल्या माहितीनुसार लग्न झालेल्या जास्तीत जास्त स्त्रिया आपल्या पतीबाबतच्या अनेक गोष्टी गुगलसर्च करतात. स्त्रिया आपल्या पतीची पसंत आणि नापसंत याबाबत गुगलला अधिकाधिक प्रश्न विचारतात. जगातील बहूतांशी स्त्रीयांना लग्नानंतर हा प्रश्न सतावत असतो की तिच्या पतीला नक्की काय आवडते ? आणि काय नाही ? काही स्त्रिया तर मनातच पतीबाबत अशा प्रश्नांचा विचार करत असतात ज्या त्या अन्य कोणाला विचारू शकत नाहीत. अशावेळी त्या गुगलचा आधार घेत आहेत.
पतीला मुठीत ठेवण्याचे उपाय काय ?
अशा काही स्त्रिया असतात ज्यांना आपल्या पतीला आपल्या मुठीत ठेवण्याचा उपाय हवा असतो. ज्या स्त्रियांना आपल्या पतीने आपलेच रहावे असे वाटत असते. अशा स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि याबाबतीत गुगलवर सर्च करत असल्याचं स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर त्यांना अजून एक प्रश्न असतो की त्या आपल्या पतीला खुश ठेवू शकत आहेत की नाही आणि पतीला खुश कसे ठेवायचे याचे ऑप्शन सुद्धा त्या सतत शोधत असतात.
पतीला आपले वेड कसे लावता येईल ?
पतीला वेडं करणे म्हणजे खरोखर वेडं करणे किंवा आपल्या मादकतेने घायाळ करण्यासाठी तो सतत आपल्याबाबतच कसा विचार करेल ? आपल्या मागे मागेच कसा येईल ? हे जाणून घेण्याची काही स्त्रियांना खूप उत्सुकता असते आणि हे प्रश्न त्या गुगलला अधिकाधिक विचारतात.
या प्रश्नांची उत्तरे गुगलवर आहेत. त्यामुळे त्या अधिकाधिक प्रश्न विचारत जातात. याशिवाय बाळाला जन्म देण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे ? यासाठी नव-याला कसं तयार करावं ? विविध मेकअप टिप्स या देखील गुगलवर सर्च केल्या जात आहेत. ज्यामुळे नवरा दुस-या महिलेकडे आकर्षित होणार नाही. याची त्या काळजी घेत असल्याचे स्पष्ट होते आहे.
कुटुंब सांभाळत कोणते करियर करता येऊ शकते ?
महिला लग्नांनंतर आपल्या कुटुंबाला अधिक वेळ देत असतात. यामूळे त्यांना कुटुंब अधिक महत्त्वाचं असते. त्यामुळे घरच्या घरी बसून आणि कुटुंब सांभाळत कोणते करियर करता येऊ शकते ? त्यामुळे जर त्यांच्या मनात करियरबाबत एखादे स्वप्न असेल तर त्याला दुय्यम स्थान देत या गोष्टी गुगलवर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. हे जाणून घेण्याकडे विवाहित स्त्रियांचा मोठा कल असतो असे दिसून आले आहे.
एक आदर्श स्त्री कसे व्हावे?
लग्नानंतर कुटुंब अधिक महत्त्वाचं झाल्याने त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी महत्वाची बनलेली असते. ज्याच्यामूळे अधिक - अधिक आपल्या कुटुंबाला खुश कसे ठेवता येईल ? याबाबत त्या गुगलवर सर्च करतात असेल दिसून आले आहे. यासाठी त्या कुटुंबाची जबाबदारी कशी उचलावी ? घरच्यांना खुश कसे ठेवावे ? एक आदर्श स्त्री कसे व्हावे? सासूला खुश कसे करावे? यांसारखे प्रश्न सतावत असल्याने हेच प्रश्न त्या गुगलसर्च करत असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.