'या' वास्तु टिप्स वाढवतील आपल्या नात्यातील गोडवा

वास्तुशास्त्राच्या मदतीने आपण आपल्या जीवनातील आनंद वाढवू शकतो
live in relationship
live in relationshipDainik Gomantak
Published on
Updated on

मनुष्य हा समाजशील प्राणी असल्याने त्याच्यावर नातेसंबंध, वास्तूसूलभता, अडचणी भांडणे, मतभेद, विवाद, विभक्त कुटुंब या घटकांचा मोठा प्रभाव असतो. मनुष्याच्या आयुष्यात नाते करुणा, प्रेम, आपुलकीचे विशेष स्थान आहे.

(bring love in your relationship with these vastu tips)

live in relationship
Solo Trip Advice: बिनधास्त भटकंती करायची असेल तर या खास गोष्टी ठेवा लक्षात

दोन लोक एकत्र येतात आपले त्यांचे जीवन एकमेकांसोबत व्यतीत करण्यासाठी आणि आपल्या नात्याची विशेष काळजी घेतात प्रेम, आधार, समायोजन, समजूतदारपणा, त्याग इत्यादींद्वारे नातेसंबंध वाढवतात याच्यात वास्तु टिप्स उपयोगी ठरतात. आणि या टिप्स आपल्या नातातील गोडवा वाढवतात.

live in relationship
National Night Out 2022: गोव्याचे हे समुद्रकिनारे नाईट लाइफसाठी सर्वोत्तम

वास्तुशास्त्राच्या मदतीने आपण नकारात्मक ऊर्जा कमी करू शकतो आणि त्यास सकारात्मक उर्जामध्ये रुपांतरित करू शकतो. सरळ वास्तु या समस्यांसाठी काही वास्तु उपाय महत्वाचे ठरतात. जीवनात ऊर्जेचे संतुलन समजावून देण्यासाठी वास्तु तत्वे स्थापन केली आहेत. सरळ वास्तु तत्त्वांमध्ये काही नियम आहेत.

'हे' 39 नियम आपले वास्तूदोष कमी करतील

बेडरूमची टापटीप पणा राखा.

संबंधासाठी वास्तुनुसार, झोपेची दिशा ही व्यक्तीच्या जन्मतारखेवर असावी.

अविवाहित व्यक्तींनी त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या आवडीनुसार मुलाचे किंवा मुलीचे काही फोटो ठेवावेत. उदा. नट / नटी

मास्टर बेडरूम फक्त जोडप्यानीच वापरली पाहिजे.

बेडरूममध्ये कोणताही आरसा ठेवू नका.

बेडरूमच्या दारासमोर आरसा ठेवू नका.

जर बेडरूममध्ये आरसा असेल तर त्याचे तोंड बेडरूम कडे असता काम नये आणि जर त्याचे तोंड बेडरूमकडे असेल तर तो कपड्याने झाकून टाकावा.

बेड तुळईच्या खाली नसावा.

जेव्हा आपण होणाऱ्या वधू / वरांना भेटायला जाता तेव्हा सकारात्मक परीणामांसाठी नेहमीच आपल्या चांगल्या दिशेला तोंड करून बसा

बेडरूममध्ये प्रवेश करताना कोणत्याही प्रकारचे फर्निचर किंवा अडथळा येता कामा नये.

बेड चौरस किंवा आयताकृती आकाराचा असावा.

बेडसाठी ओव्हल किंवा गोलाकारसारखे अनियमित आकार वापरू नका.

विवाहित जोडप्याने पलंगावर एकच गादी वापरली पाहिजे.

आक्रमक किंवा भयानक प्राणी, माणसे किंवा देव / देवीचे फोटो ठेवू किंवा लटकवू नका.

बेडरूम मधील भिंतींचे रंग सुखदायक आणि हलके असावेत.

बेडरूम चौरस किंवा आयताकृती आकाराचा असावा.

बेडरूममध्ये प्रकाश शांत आणि सुखदायक असावा.

नातेसंबंधासाठी वास्तुनुसार, टीव्ही, संगणक, लॅपटॉप किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण बेडरूममध्ये ठेवू नका.

आपले बेडरूम आणि कपाट पसारामुक्त असावा आणि अनावश्यक गोष्टी एकत्रीत करू नका.

बेडरूममध्ये पाण्याचे कोणतेही घटक जसे की वनस्पती, मत्स्यालय इत्यादी कधीही ठेवू नका.

बेडरूममध्ये पूजा घर कधीही ठेवू नका.

बेडरूममधील टॉयलेटचे दरवाजे बंद केले पाहिजेत.

नातेसंबंधासाठी वास्तू तज्ज्ञांच्या मते, आपल्या बेडरूमच्या कोपऱ्यात खिडक्या किंवा प्रवेशद्वार नसावेत कारण तेथूनच सकारात्मक उर्जा येते आणि सर्व नकारात्मक उर्जा बाहेर टाकली जाते होते.

वार्डरोबने दरवाजा उघडण्यास अडथळा आणू नये

शयनकक्षातील फर्निचरमध्ये, स्तंभ, बीम किंवा कोपऱ्याला तीक्ष्ण कडा असू नयेत.

बेड हा फक्त लाकडापासूनच बनलेला असावा.

दारासमोर पलंग ठेवू नका कारण यामुळे अस्वस्थता आणि तणाव निर्माण होतो.

तीक्ष्ण कोपऱ्यात किंवा थेट सरळ रेखेत झोपू नका.

बेडरूममध्ये नैसर्गिक प्रकाश आणि सूर्यप्रकाश असावा.

सकारात्मक उर्जा वाढविण्यासाठी बेडरूममध्ये सुगंध, सुगंध मेणबत्त्या, धूप अगरबत्ती इत्यादीचा वापर करावा.

बेडरूममध्ये सुंदर कलाकृती आणि सजावटीच्या वस्तू ठेवा.

बेडरूमचा दरवाजा नव्वद अंशांपर्यंत पूर्णपणे उघडला पाहिजे.

बेडरुमच्या व्यतिरिक्त स्वयंपाकघरही महत्वाची भूमिका पार पाडते चांगले संबंध टिकवून ठेवण्यात, त्यामुळे भांडण टाळण्यासाठी स्वयंपाकघर योग्य दिशेने असले पाहिजे.

स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटके असावे.

गॅस स्टोव्ह आणि पाण्याचे टाकी कधीही एकाच ओळीत ठेवू नका कारण ते दोघेही आग आणि पाणी यासारखे वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात. ते जोडप्यामध्ये भांडणे आणि मतभेद घडवून आणतात.

आयुष्यात आपले प्रेम परत आणण्यासाठी, लाल रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा.

सामान्य वास्तू टिप म्हणून, बेडची सर्वोत्तम दिशा पूर्व किंवा दक्षिणेस असावी.

जोडप्यांच्या कलाकृती किंवा मुर्त्या ठेवा तुमच्यातील एकत्रितपणा बळकट करण्यासाठी.

नातेसंबंधासाठी या वास्तु टिप्स सह, आपण आपल्या निरागस नात्यात रस आणू शकता आणि स्फूर्तीत आयुष्य घालवू शकता. हे वास्तु समाधान आपल्याला सुसंवाद आणि प्रेमाने जगण्यास मदत करतात. अधिक विशिष्ट वास्तु समाधानासाठी, आपण 9 ते 180 दिवसात फरक जाणण्यासाठी सरळ वास्तु तज्ज्ञांशी सल्लामसलत करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com