Red Rice Benefits: पांढऱ्या तांदळापेक्षा लाल तांदळाचे सेवन का आरोग्यदायी? वाचा सविस्तर

लाल तांदळाचे जबरदस्त फायदे माहित नसतील तर ही बातमी नक्की वाचा. तसेच पांढऱ्या भातापेक्षा लाल तांदूळ खाणे चांगले का असते ते जाणून घेऊया.
Red Rice Benefits
Red Rice BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

Red Rice Benefits: पांढरा तांदूळ हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांच्या आहाराचा सर्वात मोठा भाग आहे.

अनेक लोकांचे जेवण त्याशिवाय पुर्ण होत नाही. तांदळापासून फ्राईड राईस, बिर्याणी, इडली, डोसा यासारखे अनेक पदार्थांचे सेवन केले जाते.

जरी डॉक्टरांनी ते मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला तरी त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.यामुळे तुम्ही लाल भात एक चांगला पर्याय म्हणून खाऊ शकता. चला जाणून घेऊया लाल तांदळाचे आपल्या आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत. 

लाल तांदुळ खाण्याचे फायदे कोणते?

  • वजन कमी होईल

ज्या लोकांना आपले वजन झपाट्याने (Weight Loss) कमी करायचे आहे, त्या लोकांनी आपल्या आहारात पांढऱ्या तांदळाऐवजी लाल तांदळाचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण ते फॅट फ्री असत. तसेच पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.

  • मजबूत हाडे

लाल तांदूळ हा मॅग्नेशियमचा समृद्ध स्रोत म्हणून ओळखला जातो. जे लोक या तांदुळाचे नियमितपणे सेवन करतात त्या लोकांची हाडे पूर्वीपेक्षा मजबूत होतात आणि शरीरातील वेदनाही दूर होतात.

  • कोलेस्ट्रॉल कमी होईल

6 महिने सतत लाल तांदुळाचे सेवन केल्यास शिरामधील खराब कोलेस्टेरॉलची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होते आणि नंतर हृदयविकाराचा (Heart) धोका राहत नाही. यामुळेच रोजच्या आहारात याचा समावेश करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.

Red Rice Benefits
Why Breakfast Is Important?: 'या' कारणांमुळे सकाळचा नाश्ता करणे गरजेचे
  • कॅन्सरपासून बचाव

लाल तांदूळ अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यामुळे जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे कर्करोगासारख्या घातक रोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

  • मधुमेहामध्ये फायदेशीर

पांढरा तांदूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषापेक्षा कमी नसून आरोग्य तज्ञ देखील हा तांदुळ न खाण्याचा सल्ला देता. त्याऐवजी लाल भात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

  • लाल तांदूळ कुठे पिकते?

लाल तांदूळ हा एक तांदळाचा एक प्रकार आहे. हा तांदुळ आशियाई देशांमध्ये खास करुन भारत, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्ये पिकवला जातो. तांदळाच्या या अनोख्या जातीला त्याच्या बाह्य थरातून विशिष्ट लाल रंग प्राप्त होतो. ज्याला कोंडा असे म्हणतात. पांढरा तांदूळ बनवताना हाच भाग काढून टाकला जातो. ज्यामुळे ते कमी आरोग्यदायी होते. यांमुळे आहारात लाल तांदूळाचा समावेश करणे गरजेचे आहे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com