रॉजर फेडररने (Roger Federer) अखेर टेनिस कोर्टला निरोप दिला. लेव्हर कपमध्ये त्याचा जोडीदार राफेल नदालसोबत दुहेरीच्या सामन्यात पराभव झाला. यासह त्याची चमकदार कारकीर्दही संपुष्टात आली.
या शेवटच्या सामन्यानंतर रॉजर फेडररला आपले अश्रू अनावर झाले. या भावनिक क्षणात राफेल नदालही भावूक झाल्या.
रॉजर फेडरर हा तिसरा सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू आहे. गेल्या आठवड्यात त्याने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती.
सलग 24 वर्ष आंतरराष्ट्रीय टेनिस कारकिर्द करून अनेक विक्रम साकारण्याची किमया रॉजर फेडररने साधली आहे. तो कारकिर्दीत 1526 सिंगल्स (एकेरी) आणि 224 डबल्स (दुहेरी) मॅच खेळला.
रॉजर फेडरर वीस ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू आहे. फेडररपेक्षा राफेल नदाल 22 आणि नोव्हाक जोकोविच याने 21 ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया साधली आहे.
रॉजर फेडरर 2 फेब्रुवारी 2004 ते 10 ऑगस्ट 2008 पर्यंत 237 आठवडे एटीपी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर होता.
फेडरर आठ वेळा विंबल्डन जिंकलेला एकमेव पुरुष टेनिसपटू आहे.
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने शुक्रवार 23 सप्टेंबर 2022 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय टेनिस सामना खेळून निवृत्ती घेतली. या सामन्यात फेडररचा पराभव झाला.
रॉजर फेडररचा टेनिस कोर्टला अखेरचा निरोप....
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.