
नवा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात कोणत्या राशींसाठी शुभ काळ ठरणार आहे आणि कोणत्या राशींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, याबाबत देशाचे प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ अनिल ठाक्कर यांनी मार्गदर्शन केले आहे. चला तर जाणून घेऊया ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मेष ते मीन राशींचे साप्ताहिक भविष्य. लक्षात ठेवा, हे राशिभविष्य तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे.
मेष:
गुरु ग्रह तिसऱ्या भावात असल्याने तुमच्यात धार्मिक प्रवृत्ती वाढेल. मित्र-नातेवाईकांसोबत मंदिर दर्शनास जाण्याची संधी मिळेल. संतांचा आशीर्वाद लाभल्याने मानसिक शांती मिळेल. मान्यवर व्यक्तींशी संवाद होऊन भविष्यासाठी चांगल्या योजना आखता येतील. करिअरमध्ये पूर्वीचे अडथळे दूर होऊ लागतील. शनी देव बाराव्या भावात असल्याने मानसिक ताण कमी होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर उपक्रमातही सहभाग घ्यावा.
उपाय: दररोज "ॐ भौमाय नमः" २७ वेळा जपा.
वृषभ:
शनी महाराज अकराव्या भावात असल्याने आरोग्य उत्तम राहील. धनासंबंधी वाद मिटतील. गुरु ग्रह दुसऱ्या भावात असल्याने वाहन खरेदीचा योग आहे. घरची आर्थिक स्थिती सुधारेल. करिअर निवडीबाबत गोंधळ वाटू शकतो, मात्र मनाप्रमाणे क्षेत्र निवडणे योग्य ठरेल.
उपाय: दररोज ललिता सहस्रनामाचे पठण करा.
मिथुन: उधारी टाळा. मुलांच्या यशामुळे आनंद. चुकांसाठी माफी मागा. विदेश शिक्षणाची शक्यता.
उपाय: दररोज “ॐ महाविष्णवे नमः” ११ वेळा जपा.
कर्क: योग-ध्यान लाभदायी ठरेल. पैशांचा अपव्यय टाळा. विवाहयोग्यांना अडचणी. नोकरीत बढतीची शक्यता. विद्यार्थी प्रगती करतील.
उपाय: शनिवारी शनीसाठी हवन करा.
सिंह: आरोग्यात सुधारणा. अचानक धनलाभ. कौटुंबिक तणाव संभवतो. करिअरमध्ये अपेक्षा कमी ठेवा. गुरूंचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
उपाय: दररोज “ॐ भास्कराय नमः” १९ वेळा जपा.
कन्या: आरोग्य चांगले राहील. साठवलेले धन उपयोगी पडेल. भावंडांचा सहयोग मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थी यशस्वी होतील, आळस टाळा.
उपाय: दररोज नारायणीयम् वाचा.
तुळ: उर्जेत घट जाणवेल. व्यावसायिकांना प्रवासात खर्च वाढेल. कौटुंबिक आनंद मिळेल. भागीदारावर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करावे.
उपाय: दररोज “ॐ भैरवाय नमः” २४ वेळा जपा.
वृश्चिक: भावना नियंत्रणात ठेवा. नोकरीत उत्पन्न वाढेल. लहान गुंतवणुकीत फायदा होईल. करिअरमध्ये अहंकार टाळा.
उपाय: मंगळवारी ब्राह्मणाला भोजन द्या.
धनु: सकाळी व्यायाम, योग करा. आर्थिक स्थितीत सुधारणा. कुटुंबातील आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. विद्यार्थी अभ्यास ढकलू नयेत.
उपाय: दररोज “ॐ बृहस्पतये नमः” २१ वेळा जपा.
मकर: आरोग्यात सुधारणा. आर्थिक समस्या दूर होतील. कुटुंबात सौहार्द राखा. गुपिते उघड करू नका. विदेश शिक्षणात संयम ठेवा.
उपाय: दररोज “ॐ नमः शिवाय” २१ वेळा जपा.
कुंभ: बोलण्यात संयम ठेवा. आर्थिक स्थिती सुधारेल. मुलांसोबत वेळ घालवा. करिअरमध्ये अपेक्षा कमी ठेवा. विद्यार्थ्यांनी अनावश्यक प्रवास टाळावा.
उपाय: दररोज “ॐ वायुपुत्राय नमः” ११ वेळा जपा.
मीन: आरोग्य समस्यांपासून सावध राहा. दीर्घकालीन गुंतवणुकीत फायदा. पालकांच्या तब्येतीत सुधारणा. कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश.
उपाय: गुरुवारी गरीब ब्राह्मणाला दही-भात द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.