Horoscope: श्रावणातील शुक्रवार ठरणार खास! 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा; आर्थिक लाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

Horoscope Today: August 14, 2026: शुक्रवारचा दिवस आणि श्रावण शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी यामुळे आजचा दिवस धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जात आहे.
Horoscope Today: August 14, 2026
Horoscope Today: August 14, 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

शुक्रवारचा दिवस आणि श्रावण शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी यामुळे आजचा दिवस धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जात आहे. आज संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत द्वितीया तिथी राहणार असून, सकाळी 9 वाजून 29 मिनिटांपर्यंत परिघ योग आणि त्यानंतर शिव योगाचा प्रभाव राहील. तसेच रात्री 3 वाजून 43 मिनिटांपर्यंत पूर्वाफाल्गुनी नक्षत्र असेल. ग्रह-नक्षत्रांच्या या स्थितीचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. काही राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक आनंद मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना खर्च आणि भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल.

मेष

मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक ठरू शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांकडे तुमचा कल वाढेल. आर्थिक फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील, मात्र मेहनतीचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा बेत आखू शकता. महिलांना घरातून नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते.

शुभ रंग: पांढरा | शुभ अंक: 8

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना आज मेहनतीचे चांगले फळ मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांना महत्त्व मिळेल आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळू शकते. व्यवसायात अचानक आर्थिक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन अनुभव तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करू शकतात. आरोग्याच्या बाबतीतही उत्साह आणि ताजेपणा जाणवेल.

शुभ रंग: निळा | शुभ अंक: 6

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस काहीसा संमिश्र राहू शकतो. एखाद्या व्यक्तीशी झालेली भेट किंवा संवाद तुमच्या विचारांवर प्रभाव टाकू शकतो. भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्कात येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांना तुमच्याकडून शिकण्याची संधी मिळेल. गरजू व्यक्तीला मदत केल्याने मानसिक समाधान मिळू शकते.

शुभ रंग: लाल | शुभ अंक: 8

Horoscope Today: August 14, 2026
FC Goa vs FC Arkadag: एफसी गोवाची झुंजीनंतर हार, एफसी अर्कादाग संघाचा 3-0 दणदणीत विजय

कर्क

कर्क राशीच्या जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला ठरू शकतो. व्यवसायात फायदा झाल्यास विस्तार करण्याचा विचार करू शकता. कामातील एखादे महत्त्वाचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जोडीदाराची मदत मिळू शकते. तुमची व्यवहारकुशलता फायदेशीर ठरेल. संगीत आणि कलाक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी एखादी नवीन संधी येऊ शकते. मात्र राग किंवा भावनेच्या भरात कोणाशीही अनावश्यक वाद घालणे टाळा.

शुभ रंग: निळा | शुभ अंक: 2

सिंह

सिंह राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्त्वाची आणि पेहरावाची प्रशंसा होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात केलेल्या चांगल्या कामामुळे मान-सन्मान वाढेल. व्यवसायात आर्थिक फायदा होण्याची शक्यता असून व्यावसायिक संबंध आणखी मजबूत होतील. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे आज फायदेशीर ठरेल. आरोग्यासाठी तेलकट आणि तळलेले पदार्थ कमी घेणे योग्य ठरेल.

शुभ रंग: पीच | शुभ अंक: 9

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल ठरू शकतो. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. मेहनतीचे चांगले परिणाम लवकरच दिसू शकतात. विरोधकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाची पद्धत बदलल्यास फायदा होऊ शकतो. अडचणी आणि मानसिक तणावातून काही प्रमाणात दिलासा मिळेल.

शुभ रंग: पिवळा | शुभ अंक: 6

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्याचे सहकार्य मिळेल. कायदेशीर वादांमध्ये अडकणे टाळणे हिताचे ठरेल. आरोग्य ठीक राहण्याची शक्यता असली तरी आहाराकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल झाल्याने घरातील सुख-समृद्धी वाढू शकते.

शुभ रंग: हिरवा | शुभ अंक: 6

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. संध्याकाळपर्यंत एखादा शुभ संदेश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या अनेक संधी समोर येऊ शकतात. व्यवसायात केलेले बदल फायदेशीर ठरतील. जोडीदाराकडून महागडे किंवा आवडते गिफ्ट मिळाल्याने आनंद वाढू शकतो.

शुभ रंग: जांभळा | शुभ अंक: 8

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक राहू शकतो. अनुभवी व्यक्ती किंवा वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. धार्मिक कार्यात मन रमल्याने कुटुंबासोबत मंदिरात जाण्याचा योग येऊ शकतो. सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यक्तींना नोकरीची चांगली संधी मिळू शकते. हॉटेल मॅनेजमेंट आणि संबंधित क्षेत्रातील लोकांनाही नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे.

शुभ रंग: मरून | शुभ अंक: 7

Horoscope Today: August 14, 2026
Bison In Goa: नार्वेत गव्यांचा धुमाकूळ! भाजी पिकाची नासधूस, बंदोबस्‍ताची मागणी; ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

मकर

मकर राशीच्या जातकांसाठी दिवस सामान्य असला तरी कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल ठरू शकतो. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. मुलांसाठी घरात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करू शकता. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल.

शुभ रंग: लाल | शुभ अंक: 2

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम राहण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचे विशेषतः पालकांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाचे काम लवकर पूर्ण होऊ शकते. मनमोकळेपणाने संवाद साधल्याने नात्यांमध्ये जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असून स्पर्धा किंवा सरकारी नोकरीशी संबंधित प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळू शकते. समाजोपयोगी कामात सहभागी होण्याची संधीही मिळेल.

शुभ रंग: सोनेरी | शुभ अंक: 4

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. बालपणीच्या मित्राची अचानक भेट झाल्याने जुन्या आठवणी ताज्या होतील. बरीच दिवस रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मानसिक ताण कमी होईल. क्रीडा क्षेत्रात रस असलेल्या तरुणांसाठी दिवस उत्साहवर्धक ठरू शकतो. घरात शुभ बातमी आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम व सलोखा कायम राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com