Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Chandra Rashi Parivartan Yog 2026: आज (16 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी चंद्राने गुरुची स्वामी असणाऱ्या धनु राशीमध्ये अधिकृत प्रवेश केला.
Chandra Rashi Parivartan Yog 2026
Chandra Rashi Parivartan Yog 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Chandra Rashi Parivartan Yog 2026: आज (16 ऑक्टोबर) सकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी चंद्राने गुरुची स्वामी असणाऱ्या धनु राशीमध्ये अधिकृत प्रवेश केला. रविवारपर्यंत चंद्र याच राशीमध्ये विराजमान राहणार आहे. विशेष म्हणजे, धनु राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पति सध्या कर्क राशीमध्ये स्थित असून, कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्र आहे.

अशा प्रकारे दोन प्रमुख ग्रहांच्या परस्पर राशिपरिवर्तनामुळे अत्यंत शुभ असा 'राशिपरिवर्तन योग' जुळून आला. या खगोलीय स्थितीचा आणि चंद्र गोचराचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार असला तरी मेष, कर्क, कन्या, धनु आणि कुंभ या राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी आणि लाभदायक ठरणार आहे.

Chandra Rashi Parivartan Yog 2026
Vish Yog 2026: चंद्र गोचरने उडवली ‘या’ तीन राशींच्या लोकांची झोप, आर्थिक व्यवहारांवर विष योगाचे मोठे सावट; बिघडू शकते बजेट

मेष राशीच्या लोकांसाठी चंद्राचे हे गोचर अत्यंत शुभ असून नशिबाची भक्कम साथ लाभणार आहे. तुमचे प्रलंबित आणि रखडलेले सर्व महत्त्वाचे कागदपत्रे व कामे आता वेगाने मार्गी लागतील. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याचे योग आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल असून, भविष्यात मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

Chandra Rashi Parivartan Yog 2026
Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

कर्क राशीच्या जातकांसाठी हा राशिपरिवर्तन योग प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे कामाचा ताण कमी होईल. तुमच्या सामाजिक मान-मानसात मोठी वाढ होईल.

Chandra Rashi Parivartan Yog 2026
Trigrahi Yog 2026 October: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आनंद आणि यश घेऊन आला आहे. नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नतीचे योग जुळून येत आहेत. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनाला विलक्षण समाधान लाभेल. कुंभ राशीच्या जातकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन आर्थिक अडचणी दूर होतील. नवीन व्यवसाय किंवा प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण अधिक आनंदी आणि सकारात्मक राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com