

Vish Yog Formed Due To Saturn And Moon Transit: आज (9 ऑक्टोबर) पहाटे 3 वाजून 17 मिनिटांनी चंद्राने सिंह राशीतून कन्या राशीत गोचर केले. या खगोलीय स्थितीत शनी आणि चंद्र एकमेकांवर दृष्टी टाकत असल्यामुळे अत्यंत अशुभ मानल्या जाणाऱ्या 'विष योगा'ची निर्मिती झाली. या युतीचा प्रभाव आणि त्याचे नकारात्मक परिणाम प्रामुख्याने तीन राशींच्या जातकांच्या आयुष्यावर दिसून येणार आहेत. या काळात मानसिक ताणतणाव, आर्थिक नुकसान आणि विविध संकटांचा सामना करावा लागू शकतो.
मेष राशी: विष योगाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना मानसिक तणाव आणि आरोग्याच्या (Health) तक्रारींचा सामना करावा लागू शकतो. या काळात कोणत्याही फालतू किंवा अनावश्यक वादात पडणे टाळावे, अन्यथा मनस्ताप वाढू शकतो. आर्थिक बाजू कमकुवत होऊ शकते किंवा अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. या अशुभ प्रभावांपासून दूर राहण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी हनुमान चालीसाचे नियमित पठण करणे फायदेशीर ठरेल.
तुळ राशी: तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिक चणचणीचा ठरु शकतो, कारण अचानक खर्चामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद किंवा मतभेद होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. व्यावसायिक निर्णय घेताना सावध राहावे. या अशुभ प्रभावापासून रक्षण करण्यासाठी आणि संकटांवर मात करण्यासाठी नियमितपणे भगवान शिव यांची आराधना करावी.
कुंभ राशी: कुंभ राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधांमध्ये दुरावा किंवा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यापारी वर्गाला आर्थिक देवाण-घेवाण करताना व्यवहारांमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, त्यामुळे प्रत्येक आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. विष योगाचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी शिवजींच्या महामृत्युंजय मंत्राचा किंवा शिवनामाचा जास्तीत जास्त जाप करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.