Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Shani Budh Shadashtak Yog October 2026: द्रिक पंचांगानुसार, येत्या 9 ऑक्टोबर रोजी, शुक्रवारी आकाशामध्ये एक अत्यंत अशुभ आणि सावध करणारा योग जुळून येत आहे.
Shani Budh Shadashtak Yog October 2026
Shadashtak Yog 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Shani Budh Shadashtak Yog October 2026: द्रिक पंचांगानुसार, येत्या 9 ऑक्टोबर रोजी, शुक्रवारी आकाशामध्ये एक अत्यंत अशुभ आणि सावध करणारा योग जुळून येत आहे. या दिवशी ज्योतिष शास्त्रानुसार बुध आणि शनि ग्रह एकमेकांपासून अगदी 150 अंशाच्या अंतरावर विराजमान होऊन 'षडाष्टक योग' तयार करत आहेत. या योगाचा प्रभाव सर्वच राशींवर आणि एकूणच जनजीवनावर पाहायला मिळतो, परंतु काही विशिष्ट राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत तणावपूर्ण आणि आव्हानांनी भरलेला ठरु शकतो.

या विशेष खगोलीय स्थितीमुळे मेष, मिथुन, कर्क, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान, मानसिक अस्वस्थता आणि आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shani Budh Shadashtak Yog October 2026
Horoscope 5 October 2026: सोमवारी 'या' राशींवर बरसणार महादेवाची कृपा; धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग!

मेष राशीच्या लोकांसाठी हा षडाष्टक योग अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण करु शकतो. कार्यक्षेत्रात काम करताना वरिष्ठांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत वाद होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन विचलित होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

Shani Budh Shadashtak Yog October 2026
Horoscope: 4 ऑक्टोबरचा दिवस ठरणार खास! 'या' राशींचं नशीब उजळणार; नोकरी-व्यवसायात मोठा फायदा, प्रेमजीवनही होईल सुखकर

मिथुन राशीच्या जातकांना या अशुभ योगामुळे आर्थिक बाबतीत मोठा संघर्ष करावा लागू शकतो. कामामध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे हातात आलेले पैसे जाऊ शकतात. आरोग्याच्या (Health) दृष्टीने हा काळ अतिशय कठीण असून पोटाशी संबंधित आजार किंवा जुने विकार पुन्हा उद्भवू शकतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कोणतीही लाभाची किंवा महत्त्वाची गोष्ट करताना हालगर्जीपणा दाखवू नका.

Shani Budh Shadashtak Yog October 2026
Horoscope: पैसा, नोकरी आणि यश! गुरुवार 'या' राशींच्या व्यक्तींसाठी ठरणार खास, मिळू शकतो आर्थिक लाभ अन् प्रगतीचा योग

कर्क राशीच्या मंडळींनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. अचानक वाढलेल्या खर्चामुळे पैशांची चणचण भासेल आणि मानसिक ताण कमालीचा वाढेल. कोणाशीही वादविवाद किंवा कलह करण्यापासून दूर राहावे. कन्या राशीच्या जातकांसाठी हा योग अत्यंत अशुभ मानला गेला असून, या काळात घाईघाईने कोणताही मोठा किंवा महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे. पैशांच्या देवाणघेवाणीत अत्यंत सावधगिरी बाळगून अनावश्यक आणि फालतू खर्च टाळावा.

Shani Budh Shadashtak Yog October 2026
Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

मकर राशीच्या लोकांना या षडाष्टक योगाच्या प्रभावामुळे तीव्र मानसिक तणाव जाणवू शकतो. विशेषतः व्यावसायिक आणि व्यापार करणाऱ्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागू शकते. या सर्वच राशींच्या लोकांनी 9 ऑक्टोबरनंतर येणाऱ्या काळात पावले अत्यंत जपून टाकणे हिताचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com