झुआरी कारखाना हस्तांतरण म्हणजे ‘फास्ट ट्रॅक’ विक्री

सरदेसाई : औद्योगिक कारणासाठी वापर न झाल्यास जमीन काढून घ्या!
Vijay Sardesai News | Zuari Factory News
Vijay Sardesai News | Zuari Factory NewsDainik Gomantak

मडगाव: झुआरी खत कारखाना 2315 कोटींच्या बदल्यात पारादीप फॉस्फेट कंपनीकडे हस्तांतरण करण्याचा जो सौदा झाला आहे, त्याबद्दल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शंका उपस्थित केली आहे. हा प्रकार म्हणजे ''फास्ट ट्रॅक'' विक्री तर नव्हे ना, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

(Zuari factory transfer is a 'fast track' sale)

Vijay Sardesai News | Zuari Factory News
मॉन्सूनची कारवारपर्यंत आगेकूच; दोन दिवस राज्यात पाऊसच नाही

19 ऑक्टोबर 2019 रोजी तत्कालीन उद्योग मंत्री आणि विद्यमान नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी झुवारी कंपनीने आपले उत्पादन बंद केल्यास या कारखान्यासाठी जी 1 हजार एकर जमीन दिली आहे, ती परत घेण्यासाठी अध्यादेश काढावा, अशी सूचना केली होती याची आठवण करून देत, जर या जमिनीचा वापर बिगर औद्योगिक कारणासाठी झाल्यास सरकार ही जमीन या कंपनीकडून काढून घेणार का? असा सवाल केला आहे.

या जमिनीचा औद्योगिक कारणासाठी वापर व्हावा, यासाठी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी ती झुआरी कंपनीला दिली होती.

Vijay Sardesai News | Zuari Factory News
शहरी बाजारपेठा पडताहेत ओस!

जर भाऊसाहेबांचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर कवडीमोलाने या कंपनीला दिलेली जमीन सरकारने परत घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चौकशी करण्याचे राणे यांना साकडे

सध्या हा व्यवहार पाहिल्यास या जमिनीचा वापर रियल इस्टेट व्यवहारासाठी होणार, अशी शंका उपस्थित करून झुआरी कारखान्याला दिलेली ही जमीन औद्योगिक विभागातून काढून ती व्यावसायिक क्षेत्र विभागात तर घालण्यात आली नाही ना, याचीही मंत्री विश्‍वजीत राणे यांनी चौकशी करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com