पणजी: मॉन्सूनने कारवारपर्यंत आगेकूच केली आहे. मात्र, मॉन्सूनसाठी अत्यावश्यक असणाऱ्या पावसाचे प्रमाण नसल्याने मॉन्सूनला ऍडव्हान्स दाखवण्यामध्ये हवामान खात्यासमोर अडचणी येत आहेत. येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता कमी असून 8 जूनपासून सक्रिय होवू शकतो असे हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
(Rain is expected to be active in the state from June 8 In Goa)
भारतीय उपखंडात वेळी अगोदर दाखल झालेल्या मॉन्सूनचा प्रवास काहीसा रेंगाळला आहे. सुरवातीला तो दक्षिण अरबी समुद्रात अडखळला होता आणि आता कारवार भागांमध्ये पाऊस रेंगाळला आहे. मॉन्सूनसाठी अत्यावश्यक असणाऱ्या 2.5 मिमी पावसाची नोंद कर्नाटक, तमिळनाडूमध्ये अनेक स्टेशनवर झालेली नाही. मात्र, मॉन्सून उत्तरांचल (नॉर्थईस्ट) सक्रिय असून ईशान्य भागातील सर्व राज्यांत मॉन्सून सक्रिय आहे.
..तर मॉन्सून सक्रिय
वाऱ्यांची स्थिती, आद्रता, ढग मॉन्सूनसाठी पोषक नाही. त्यामुळे दोन दिवसांत पावसाची शक्यता कमी आहे. पाऊस 8 जूनपासून सक्रिय झाला तर मान्सून सक्रिय होऊ शकतो असे हवामान खात्याचे अधिकारी एम राहुल यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.