Goa Accident Deaths: चिंताजनक! गोव्‍यात 308 दिवसांत तब्‍बल 216 जणांचे बळी; अपघाती मृत्यूंची वाढती संख्या

Goa Road Accident: गोव्‍यातील रस्‍ते आणि गोव्‍यातील वाहतूक ही बऱ्याच जणांसाठी जीवघेणी ठरत आहे, हे कालच्‍या अपघातानंतर पुन्‍हा स्‍पष्‍ट झाले आहे.
Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गतवर्षी म्‍हणजे २०२४ मध्‍ये गोव्‍याच्‍या रस्‍त्‍यावर २८६ जणांचे अपघातात बळी गेले होते. त्‍यामानाने यंदाची स्‍थिती काही प्रमाणात बरी असली तरी गोव्‍यातील रस्‍ते आणि गोव्‍यातील वाहतूक ही बऱ्याच जणांसाठी जीवघेणी ठरत आहे, हे कालच्‍या अपघातानंतर पुन्‍हा स्‍पष्‍ट झाले आहे.

१ जानेवारी ते ४ नोव्‍हेंबर या ३०८ दिवसांत गोव्‍यात २०८ अपघात जीवघेणे ठरले असून त्‍यात २१६ जणांचे बळी गेले आहेत. बांबोळी येथे जो अपघात घडला त्‍यात ‘रेंट अ कार’ होती. गोव्‍यातील वाढत्‍या अपघातात ‘रेंट अ कार’ आणि ‘रेंट अ बाईक’ यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असल्‍याचे दिसून आले आहे.

यंदाच्‍या पहिल्‍या दहा महिन्‍यांत या प्रकारच्‍या वाहनांचे लहान मोठे असे ३५ अपघात नोंद झाल्‍याचीही माहिती वाहतूक पोलीस विभागाकडून मिळाली आहे.

दरम्यान, १ जानेवारी ते आजपर्यंतच्‍या एकूण ३०८ दिवसांत गोव्‍यात तब्‍बल २१६ जणांचे बळी गेेले आहेत. हे प्रमाण पाहिल्‍यास गाेव्‍यात दर ३४ व्‍या तासांला एकाचा बळी रस्‍त्‍यावर जात असल्याचे स्‍पष्‍ट होते.

दहा महिन्यात जे ३५ अपघात झाले आहेत, त्‍यातील सर्वाधिक अपघात हणजूण पोलीस स्‍थानकाच्‍या हद्दीत झाले आहेत. या हद्दीत एकूण १३ अपघातांची नाेंद झाली आहे. कळंगुट व साळगाव या पोलीस स्‍टेशनात प्रत्‍येकी ५, वेर्णा पोलीस स्‍थानकात चार, मांद्रे आणि काणकोण पोलीस स्‍थानकात प्रत्‍येकी ३ तर जुने गोवे आणि मुरगाव पोलीस स्‍थानकात प्रत्‍येकी एका अपघाताची नोंद झाली आहे.

Goa Accident
Goa Accident Death: भरधाव टँकर येऊन आदळला, कारचा चक्काचूर; दोघाजणांच्या अपघाती मृत्यूमुळे क्रीडाक्षेत्रात हळहळ

दुचाकींचे वाढले अपघात

आतापर्यंत ज्‍या २१६ जणांना रस्‍ता अपघातात मृत्‍यू आला त्‍यापैकी १५१ बळी हे दुचाक्‍यांशी संबंधीत असून यापैकी १२५ जण दुचाकी चालविणारे तर २६ जण मागे बसणारे आहेत. त्‍या पाठाेपाठ सर्वांत अधिक मृत्‍यू रस्‍त्‍यांवरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांचे झाले असून एकूण ४८ पादचारी वाहनांच्‍या धडकेमुळे ठार झाले. इतर अपघाती मृत्‍यूमध्‍ये ८ मृत्‍यू वाहन चालकांचे असून चार मृत्‍यू प्रवाशांचे एक मृत्‍यू सायकलस्‍वाराचा तर चार मृत्‍यू वाहनात बसलेल्‍या सहप्रवाशांचे असल्‍याची माहिती गोवा वाहतूक पोलिसांकडून मिळाली आहे.

Goa Accident
Chhattisgarh Train Accident: छत्तीसगढमध्ये मोठा रेल्वे अपघात! लोकल ट्रेनची मालगाडीला जोरदार धडक,10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी; प्रवाशांची धावपळ VIDEO

भाड्याची वाहने अन्‌ पर्यटक

गोव्‍यात ‘रेंट अ कार’ व ‘रेंट अ बाईक’ या वाहनांचे अपघात हाेण्‍याची संख्‍या वाढत आहे. जानेवारी ते नोव्‍हेंबर या कालावधीत अशाप्रकारचे एकूण ३५ अपघात घडले आहेत. नोव्‍हेंबर महिना सुरु होऊन चार दिवस उलटले असताना या चार दिवसांत अशाप्रकारचे तीन अपघात झाल्‍याची माहिती वाहतूक संचलनालयाकडून मिळाली आहे.

गोव्‍यात येणारे पर्यटक भाड्याने वाहने घेऊन प्रवास करतात. मात्र या पर्यटकांना गोव्‍यातील रस्‍त्‍यांची फारशी माहिती नसते. त्यामुळेच त्‍यांच्‍याकडून अपघात होतात, असे मत वाहतूक संचालनालयाच्‍या एका अधिकाऱ्याने व्‍यक्‍त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com