Goa Politics: खरी कुजबुज; ही तर भाजप प्रवेशाची नांदी!

Khari Kujbuj Political Satire: राय हा गाव एकेकाळी पक्‍का भाजपविराेधी गाव म्‍हणून ओळखला जायचा. मात्र याच रायमध्‍ये भाजपने यावेळी आपली पंचायत स्‍थापन करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

ही तर भाजप प्रवेशाची नांदी!

जिल्हा पंचायतीचा हरमल मतदारसंघ महिला उमेदवारासाठी राखीव झाला आहे. आमदार जीत आरोलकर यांच्या पत्नी सिद्धी यांनी भाजपची उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. जीत हे मगोचे आमदार आहेत. या निवडणुकीत मगो भाजपची युती आहे. त्यामुळे त्यांनी मगोची उमेदवारी मागितली असती तर ते संयुक्तिक किंवा नैसर्गिक ठरले असते. त्यांनी थेटपणे भाजपची उमेदवारी मागितल्याने जीत यांच्या भाजप प्रवेशाची ही नांदी असल्याची चर्चा पेडण्यात सुरू झाली आहे. २०२७ मध्ये मांद्रे विधानसभा मतदारसंघात जीत हेच भाजपचे उमदेवार असतील, असे आता त्याचमुळे बोलले जाऊ लागले आहे. ∙∙∙

रायमध्‍ये पंचायत भाजपकडे आणण्‍यास रमेशचाही हात!

राय हा गाव एकेकाळी पक्‍का भाजपविराेधी गाव म्‍हणून ओळखला जायचा. मात्र याच रायमध्‍ये भाजपने यावेळी आपली पंचायत स्‍थापन करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे. वास्‍तविक या सर्वांचे श्रेय भाजपचे स्‍थानिक नेते आणि भाजप एसटी मोर्चाचे माजी उपाध्‍यक्ष अँथनी बार्बोझा यांना द्यावे लागेल. कारण, त्‍यांनीच आपल्‍या जीवाचे रान करून ही पंचायत भाजपकडे ओढली. मात्र यासाठी त्‍यांना कला व संस्‍कृती मंत्री रमेश तवडकर यांचाही भक्‍कम पाठिंबा लाभला, असे सांगितले जाते. यामागे तवडकर आणि गोविंद गावडे यांच्‍यातील वादाचीही किनार असल्‍याचे सांगितले जाते. गोविंद गावडे यांनी मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍या विराेधी वक्‍तव्‍य केल्‍यानंतर त्‍यांना मंत्रिमंडळातून डच्‍चू देण्‍यात आला होता. असे असतानाही भाजप सरकारला पाठिंबा देणारे कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांनी गोविंद गावडे बरोबर त्‍याच काळात गल्‍फचा दौरा केला होता. या दौऱ्यामुळेच रेजिनाल्‍डच्‍या हातात असलेली पंचायत भाजपने हिसकावून घेतली असे सांगितले जाते. त्‍यासाठीच असेल कदाचित ही पंचायत भाजपकडे येण्‍यासाठी रमेश तवडकर यांनीही अँथनी बार्बोझा यांना भक्‍कम पाठिंबा दिला होता.∙∙∙

सावर्डेतील मतदारसंघ गणेशभाऊ राखणार का?

हा सावर्डे मतदारसंघ म्‍हणजे विधानसभेचा नव्‍हे तर जिल्‍हा पंचायतीचा. सावर्डे जिल्‍हा पंचायत निवडणुकीत लढण्‍यासाठी विद्यमान सदस्‍य सुवर्णा तेंडुलकर यांच्‍यासह ट्रक संघटनेचे अध्‍यक्ष वल्‍लभ दळवी यांनीही दावा केला होता. मात्र हा मतदारसंघ एसटीसाठी आता राखीव झाल्‍याने त्‍या दोघांचीही विकेट आपोआप पडली. अाता या मतदारसंघात आमदार गणेश गावकर यांचे खंदे समर्थक असलेले मोहन गावकर यांना भाजपची उमेदवारी मिळणार हे जवळपास नक्‍की झाले आहे. यामुळे या मतदारसंघातील गणेश गावकर विरोधक एकत्र आले असून त्‍या सर्वांकडून ॲड आधिष गावकर यांना उमेदवार म्‍हणून उभे करण्‍याचे ठरले आहे. या मतदारसंघात मोहन गावकर यांच्‍या विरोधात फारसे कुणी नसले तरी आमदार गणेश गावकर यांना विरोध आहे. त्‍यामुळे त्‍याचा फटका विनाकारण मोहन गावकर यांना बसू शकतो. गणेश गावकर भाजपचा हा मतदारसंघ भाजपकडेच ठेऊ शकतील का0 असा प्रश्र्‍न आता विचारला जाऊ लागला आहे. ∙∙∙

धाकूंचा मतदारसंघ गेला

ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून काम कऱण्याची संधी मिळालेल्या धाकू मडकईकर यांना जबर धक्का बसला आहे. त्यांचा सेंट लॉरेन्स हा मतदारसंघ ओबीसी महिला असा राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांना आता नवा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. जिल्हा पंचायत ते विधानसभा असा प्रवास धाकू करू शकणार होते. आता जिल्हा पंचायतीसाठी मतदारसंघच न राहिल्याने त्यांना आपला प्रभाव कायम राखण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी लागणार आहे. तसे न केल्यास विधानसभेची त्यांची वाटचाल खडतर होऊ शकते. ∙∙∙

ही तर भाजप प्रवेशाची नांदी!

जिल्हा पंचायतीचा हरमल मतदारसंघ महिला उमेदवारासाठी राखीव झाला आहे. आमदार जीत आरोलकर यांच्या पत्नी सिद्धी यांनी भाजपची उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. जीत हे मगोचे आमदार आहेत. या निवडणुकीत मगो भाजपची युती आहे. त्यामुळे त्यांनी मगोची उमेदवारी मागितली असती तर ते संयुक्तिक किंवा नैसर्गिक ठरले असते. त्यांनी थेटपणे भाजपची उमेदवारी मागितल्याने जीत यांच्या भाजप प्रवेशाची ही नांदी असल्याची चर्चा पेडण्यात सुरू झाली आहे. २०२७ मध्ये मांद्रे विधानसभा मतदारसंघात जीत हेच भाजपचे उमदेवार असतील, असे आता त्याचमुळे बोलले जाऊ लागले आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; घराबाहेर आले...पोलिस घेऊन गेले...!

दामू यांची खेळी

विरोधकांच्या काळात पेरलेले बी आज उगवले, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मोठी खेळी खेळली आहे. यामुळे चर्चेतील अनेक मुद्दे गायब झाले असून दामू काय बोलले याचीच चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटना असलेल्या ‘एनएसयुआय’ने दामू यांच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची वेळ मिळवली असल्याचे जाहीर केले तरी दामू आपल्या मतापासून हटलेले नाहीत. त्यांनी आपल्या वक्तव्याने विरोधातील प्रत्येकाला बोलायला लावले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या वेळीच धृवीकरणाचे राजकारण करण्यासाठी दामू यांनी टाकलेले पाऊल कोणाच्या लक्षात आले नाही. त्यांच्या वक्तव्याला उत्तर द्यायला प्रत्येकजण गेला आणि दामू यांनी आपल्‍याकडे लक्ष वेधून घेतले आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: 'अभियंत्याला पोलिसांनी नेले, वीज मंत्री काय करीत आहेत'? पाटकरांचा सवाल; अभ्यास करण्याचा ढवळीकरांना सल्ला

‘बिर्याणी’चा सुगंध पोलिसांपर्यंत!

मोरजीत खून झाला... संशयित अटकेत... आणि त्या घटनेचं गांभीर्य अजून टिकून असतानाच, अचानक ‘बिर्याणी’चा सुगंध पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला म्हणे! स्थानिक चर्चा करतात की, खून झालेल्या जागेच्या व्यवस्थापकाच्या गाडीतून बिर्याणी मांद्रे पोलिस स्थानकात आली. गंमत म्हणजे त्या गाडीत खुद्द काही पोलिस कॉन्स्टेबलही सोबत होते. आता लोक विचारताहेत की बिर्याणी संशयिताच्या गाडीतून आली, मग त्यात कोणता ‘मसाला’ असा ‘एक्स्ट्रा’ होता का? खून प्रकरण बाजूला राहिलं, पण पोलिस आणि संशयितांतल्या या ‘स्वादिष्ट भेटीगाठीं’ची चर्चा गावात रंगत आहे. आता लोक म्हणतात, ‘जर बिर्याणीवरच खटला मिटणार असेल, तर...∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com