Goa Politics: 'अभियंत्याला पोलिसांनी नेले, वीज मंत्री काय करीत आहेत'? पाटकरांचा सवाल; अभ्यास करण्याचा ढवळीकरांना सल्ला

Amit Patkar: थिवी उपकेंद्रावरील जेईला पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सकाळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांची भेट घेतली.
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वीज खात्याचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत आहेत. मात्र, निवडणूक कामाकडे दुर्लक्ष केल्याने वीज अभियंत्याला पोलिसांनी नेले, मग वीज मंत्री काय करीत आहेत, असा सवाल करून वीज मंत्र्यांनी आता अशा प्रकारांवर अभ्यास करावा, असा उपरोधिक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी लगावला.

थिवी उपकेंद्रावरील जेईला पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सकाळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांची भेट घेतली. प्रशासनाकडून झालेल्या या कारवाईचा निषेध करीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला.

पाटकर म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यात मतदार यादी पुनर्पडताळणीचे (एसआयआर) काम सूरू केले आहे. राज्यभरात बीएलओंच्यावतीने गणतीचे (ॲन्युमेरेशन) अर्जवाटपाचे काम कालपासून सुरू झाले आहे. याच कामाबाबत वीज खात्याचे कार्यकारी अभियंता आणि उपजिल्हाधिकारी यांच्यातील संभाषणाची ध्वनीमुद्रण व्हायरल झाले.

त्यातून उपजिल्हाधिकारी वीज खात्याच्या अभियंत्यावर दबाव आणत असल्याचे दिसते. थिवी येथील जे उपकेंद्र आहे, त्या ठिकाणी काम करणारे कनिष्ठ अभियंता (जेई) यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलिसांकरवी ताब्यात घेण्यात आले. पाटकर पुढे म्हणाले, जेईला ताब्यात घेण्याविषयी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी सकाळी विचारणा केली, त्यांनी सांगितले.

आम्ही त्यास नियमानुसार ताब्यात घेतले, असे त्यांचे म्हणणे. परंतु जेई ड्युटीवर असताना त्याला कसे रात्रीच्यावेळी ताब्यात घेतले, त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. वीज सेवा अत्यावश्यक सेवा असून उत्तर गोव्याची सर्व यंत्रणा त्या उपकेंद्रावर अवलंबून आहे. असे असूनही तेथील जेईला पोलिस ताब्यात घेतात, ही लज्जास्पद बाब आहे.

Amit Patkar
Amit Patkar: 'आपल्याच पक्षातील लोक प्रसारमाध्यमांकडे चुकीची माहिती पोहोचवतायेत'; अमित पाटकर असं का म्हणाले?

शेट्येंची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

कोलवाळ पोलिसांनी एईला ताब्यात घेतल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ शेट्ये यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात स्पष्टीकरण मागण्यासाठी धाव घेतली होती. उपविभागीय दंडाधिकारी सुयश खांडेपारकर यांच्या सूचनेनुसार ‘एई‘ला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमागील कारण अस्पष्ट झाल्याने शेट्ये यांनी या प्रकरणात पारदर्शकतेच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता.

Amit Patkar
Smart Electricity Meter: 3 वर्षांत प्रत्‍येक घराला 'स्मार्ट वीज मीटर' बसणार! वीज खात्याची तयारी; अचूक बिल, चोरी रोखण्यास मदत

‘त्या’ कर्मचाऱ्यांना मतदारयादीचे काम नाही!

उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी अत्यावश्यक सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांना मतदार यादी पडताळणीचे काम दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की वीज अभियंत्यांचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. त्यावेळी संबंधित वीज सहायक अभियंत्याला पोलिस ठाण्यात नव्हे, तर सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेण्यात आले. तो अभियंता अत्यावश्यक सेवेत असल्याचे दिसल्यावर पाचच मिनिटात त्याला जाऊ देण्यात आले. वीज अभियंत्यांच्या भेटीनंतर हा वाद निकालात निघाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com