Sambhajiraje Meets Goa CM: संभाजीराजे छत्रपतींना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिले हे पुस्तक; कारण आहे खास

Sambhajiraje Meets Goa CM: मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी संभाजीराजेंना संदीप मुळीक लिखित गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर हे पुस्तक भेट दिले.
Sambhajiraje Meets Goa CM: संभाजीराजे छत्रपतींनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट; विविध मुद्यांवर झाली चर्चा
Sambhajiraje Chhatrapati Meets Goa CM Pramod SawantCM Sawant X Handle
Published on
Updated on

Sambhajiraje Chhatrapati Meets Goa CM Pramod Sawant

पणजी: माजी खासदार तसेच रायगड संवर्धन समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गुरुवारी (२६ डिसेंबर) भेट घेतली. या भेटीत गोव्याचा ऐतिहासिक वारसा आणि गड - किल्ल्यांचा संस्कृतीला उजाळा देण्यात आला. मुख्यमंत्री सावंत आणि संभाजीराजेंनी या भेटीची माहिती एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संभाजीराजे यांच्यासोबत झालेल्या भेटीचा फोटो त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरुन शेअर केला आहे. सावंत यांनी यावेळी संभाजीराजेंना संदीप मुळीक लिखित गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकात गोव्यातील गडकिल्ल्यांचा वारसा सविस्तरपणे चित्रीत करण्यात आला आहे.

Sambhajiraje Meets Goa CM: संभाजीराजे छत्रपतींनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट; विविध मुद्यांवर झाली चर्चा
Mumbai Goa Highway Traffic: मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, पर्यटक अडकले रस्त्यातच

संभाजीराजे यांनी देखील या भेटीचा फोटो एक्सवरुन शेअर केला आहे. "गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गोमांतकीय दुर्गाच्या वाटेवर हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकात श्री शिवछत्रपती महाराज आणि शिवपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यात केलेल्या पराक्रमांची आणि गडकिल्ल्यांच्या महत्त्वाची सविस्तर माहिती दिली आहे."

Sambhajiraje Meets Goa CM: संभाजीराजे छत्रपतींनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट; विविध मुद्यांवर झाली चर्चा
Manmohan Singh: 'मी गोव्यात काय करू', जेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पडला होता प्रश्न

"यावेळी दुर्गराज रायगड किल्ल्याचे चाललेले संवर्धन, तसेच महाराष्ट्र आणि गोव्यामधील इतर गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. मा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वतः शिवप्रेमी असल्यामुळे त्यांचा मराठ्यांच्या इतिहास आणि गडकिल्ल्यांविषयी असलेला आत्मीयतेचा दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवला. त्यांच्या सहकार्याने किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला जाईल, असा विश्वास वाटतो", असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com