Sawantwadi Tourist Attack: सावंतवाडीतील पर्यटकांना मांद्रेत मारहाण? पोलिसांनी दखल न घेतल्‍याचा आरोप, पत्रादेवी येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला

Goa Police: मांद्रे येथे सावंतवाडीतील पर्यटकांना झालेल्या मारहाणीची यंत्रणेने दखल न घेतल्याने संतप्त युवा शिवसेना कार्यकर्त्यांनी पत्रादेवी येथे मुंबई-गोवा महामार्ग अर्धा तास रोखला.
Sawantwadi Tourist Attack
Sawantwadi Tourist AttackDainik Gomantak
Published on
Updated on

बांदा/मोरजी: मांद्रे येथे सावंतवाडीतील पर्यटकांना झालेल्या मारहाणीची यंत्रणेने दखल न घेतल्याने संतप्त युवा शिवसेना कार्यकर्त्यांनी पत्रादेवी येथे मुंबई-गोवा महामार्ग अर्धा तास रोखला. येथील पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तसेच आमदार जीत आरोलकर यांच्‍या मध्‍यस्‍तीनंतर वाहतूक पूर्ववत झाली. हा प्रकार आज दुपारी घडला.

यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या ‘माझ्यासह आमच्या तळवडे येथील कुटुंबातील व्यक्तींना गोव्यात ४० हून अधिक जणांनी दारूच्या नशेत मारहाण केली. ५ वर्षांच्या लहान मुलीसह महिलांवरही हल्ला करण्यात आला व धक्काबुक्की केली गेली. मात्र, गोवा पोलिसांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.

Sawantwadi Tourist Attack
BITS Pilani: विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य सुरक्षा जपा! 'बिट्‌स पिलानी'मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

उलट रात्रीच्या सुमारास ते नशेतच असतील. यात तुम्हालाच त्रास होईल, असे गोवा पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती परब यांनी दिली. संबंधितांना पोलिस ताब्यात घेत नाहीत तोवर एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. बांदा येथील काही नागरिकांकडून रुग्णवाहिकेला होणारा अडथळा बघता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com