BITS Pilani: विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य सुरक्षा जपा! 'बिट्‌स पिलानी'मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

BITS Pilani mental health review: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्‌स यांनी घेतला.
BITS Pilani
BITS PilaniDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सांकवाळ येथील बिट्स पिलानी शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्‌स यांनी घेतला.

बैठकीस उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर तसेच बिट्स व्यवस्थापनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मानसिक तणाव, नैराश्य किंवा इतर समस्यांबाबत त्वरित मदत मिळावी यासाठी कॅम्पसमध्ये २४x७ समुपदेशन केंद्र सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

BITS Pilani
Goa mining: आनंदम, व्यंकटेश्वरना प्रत्येकी दोन खाण पट्टे, चार खाणपट्ट्यांचा लिलाव पूर्ण; दोन पट्ट्यांचा निर्णय सुनावण्‍यांनंतर

विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधून त्यांना भावनिक आधार द्यावा, तसेच योग, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिरे यांसारखे उपक्रम नियमित आयोजित करावेत, असेही निर्देश देण्यात आले. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कुशावती जिल्ह्यातील उपाययोजनांचाही अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी आढावा घेतला.

BITS Pilani
Goa Weather Update: गोव्यात उन्हाचा 'हिट'मॅन! सलग 3 दिवस पारा 35 अंशांवर, नागरिक उकाड्याने हैराण

मुख्य सूचना

२४x७ समुपदेशन केंद्र सुरू ठेवणे

विद्यार्थ्यांशी नियमित संवाद वाढवणे

योग व क्रीडा उपक्रम राबविणे

आरोग्य तपासणी शिबिरे घेणे

मानसिक आरोग्य जनजागृती वाढवणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com